व्हॉटसअॅपवर आत्महत्येचे स्टेटस ठेवून नाशिकमध्ये अल्पवयीन प्रेमीयुगुलाने जीव देण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ

चक्क व्हॉट्सअॅपवर आत्महत्या करणार असल्याचे स्टेटस ठेवून एका प्रसिद्ध लॉजमध्ये जीव देण्याचा प्रयत्न एका अल्पवयीन प्रेमीयुगुलाने केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

व्हॉटसअॅपवर आत्महत्येचे स्टेटस ठेवून नाशिकमध्ये अल्पवयीन प्रेमीयुगुलाने जीव देण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 11:32 AM

नाशिकः चक्क व्हॉट्सअॅपवर आत्महत्या करणार असल्याचे स्टेटस ठेवून एका प्रसिद्ध लॉजमध्ये जीव देण्याचा प्रयत्न  एका अल्पवयीन प्रेमीयुगुलाने केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी देवळा (जि. नाशिक) येथील हॉटेल व्यवस्थापकाविरोधात बेकायदा प्रवेश दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या भयंकर अशा घटनेची सविस्तर माहिती अशी की, देवळा शहरातील या प्रेमीयुगुलाचे एकमेकांवर प्रेम आहे. सुरुवातीला मैत्री झाली आणि त्यातून प्रेमाचा अंकुर फुलला. मात्र, दोघेही अल्पवयीन. त्यामुळे आपला काही विवाह होणार नाही. आपल्याला एकत्र राहता नाही. एकत्र जगता येणार नाही, असे त्यांना वाटायचे. त्यामुळे दोघांनाही नैराश्याने ग्रासले होते. हे पाहता त्यांनी आपण सध्या एकत्र जगू शकत नाही. मात्र, मरू शकतो म्हणत आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी देवळा इथल्या प्रसिद्ध अशा वेलकम हॉटेलमध्ये एक रूम बुक केली. त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी आपल्या व्हॉट्सअॅपवर आत्महत्या करणार असल्याचे स्टेट्स ठेवले. त्यानंतर एक विषारी औषध प्राशन केले. मात्र, या दोघांच्याही मित्रांनी हे व्हॉट्सअॅपस्टेटस पाहिल्याने तात्काळ हॉटेलकडे धाव घेतली. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे दोघांचाही जीव वाचला. याप्रकरणी अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये कसलीही ओळखपत्र न घेता रूम दिली म्हणून हॉटेल व्यवस्थापक दीपक सुभाष अहिरे (रा. चिराई, ता. बागलाण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून या अल्पवयीन प्रेमीयुगलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेलमध्ये नोंदीत अनागोंदी

देवळा येथील हॉटेल वेलकम हे सुनील आहेर यांच्या मालकीचे असल्याचे समजते. ते त्यांनी दीपक आहिरेला भाडेतत्त्वार चालवायला दिले होते. आहिरेसोबत तसा करारनामाही केला आहे. मात्र, आहिरेने अल्पवयीन मुलांना हॉटेलमध्ये रूम द्यायला सुरुवात केली होती. त्यासाठी कुठलेही ओळखपत्र मागितले जायचे नाही. त्यांच्या नावाची नोंदही रजिस्टरमध्ये ठेवली जायची नाही, असे प्रकार सुरू होते. त्यामुळे अनेक अल्पवयीन जोडपे या हॉटेलमध्ये असे वारंवार येत असतात, असे समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आहिरेवर गुन्हा दाखल केला आहे.

इतर बातम्याः

शिरजोर चोरट्यांची दसऱ्यादिवशी सलामी; गॅस कटरने एटीएमचे तुकडे करून नाशिकमध्ये 23 लाखांची धाडसी चोरी

दसऱ्याच्या दिवशी लेकीला सासरी भेटून परतणाऱ्या वडिलांचा कारच्या धडकेत मृत्यू; दुचाकी जळून खाक, मेहुणा गंभीर

सप्तश्रृंगी गडावर 500 वर्षांची परंपरा; 4600 फूट उंच सुळक्यावर मध्यरात्री लावला कीर्तीध्वज, जाणून घ्या डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.