जीवाचा अंत बघेपर्यंत रुग्णवाहिकेची वाट पाहण्याची वेळ, संतप्त पतीकडून Ambulance हायजॅक, पीडितेवर अखेर उपचार सुरु

देशात कोरोनाचा प्रचंड धुमाकूळ सुरु आहे. अनेकांना बेड, ऑक्सिजन बेड मिळत नाहीय. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे (Man hijacked Ambulance for his corona positive pregnant wife)

जीवाचा अंत बघेपर्यंत रुग्णवाहिकेची वाट पाहण्याची वेळ, संतप्त पतीकडून Ambulance हायजॅक, पीडितेवर अखेर उपचार सुरु
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 5:38 PM

भोपाळ (मध्य प्रदेश) : देशात कोरोनाचा प्रचंड धुमाकूळ सुरु आहे. अनेकांना बेड, ऑक्सिजन बेड मिळत नाहीय. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. या मनस्तापामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना आता चांगल्या-वाईटचं भान राहिलेलं नाही. त्यांच्याकडून संतापात आक्रोश व्यक्त केला जातोय. मध्य प्रदेशच्या विदिशी जिल्ह्यात अशीच काहीशी घटना घडली आहे. एका कोरोनाबाधित गर्भवती महिलेसाठी रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने तिच्या पतीकडून संताप व्यक्त करण्यात आला. त्याने संतापात एक रुग्णवाहिका दोन तास अडवून धरली. अखेर पोलिसांच्या मध्यस्तीने संबंधित प्रकरण निवळलं (Man hijacked Ambulance for his corona positive pregnant wife).

नेमकं प्रकरण काय?

मध्य प्रदेशच्या विदिशा जिल्ह्यातील पुतली घाट क्षेत्रातील मुखर्जी नगर येथे कुशवाह परिवार वास्तव्यास आहे. चार दिवसांपूर्वी कुशवाह कुटुंबातील गर्भवती महिलेला अस्वस्थ वाटू लागलं. तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. विशेष म्हणजे गर्भवती महिला ही कोरोनाबाधित होती. तिचा पती सुनील कुशवाह याने तिच्यासाठी ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था केली. रात्री अकरा वाजेपासून तो 108 नंबरवर फोन करुन वारंवार रुग्णवाहिकेसाठी फोन करत होता, जेणेकरुन त्याच्या पतीला रुग्णालयात दाखल करता येईल.

रुग्णवाहिका दुसऱ्यादिवशी घरी पोहोचली

सुनीलने एका रुग्णालयाच्या डॉक्टरांशी बातचित केली होती. तिथे पीडित पत्नीसाठी ऑक्सिजन बेड शिल्लक होता. मात्र, त्यासाठी रुग्णवाहिका मिळत नव्हती. तो वारंवार रुग्णवाहिकेसाठी फोन करत होता. मात्र, एकही रुग्णवाहिका त्याच्या घरी पोहोचली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता एक रुग्णवाहिका त्याच्या घराबाहेर दाखल झाली.

सुनीलकडून संताप व्यक्त

रात्रभर इतके फोन करुनही रुग्णवाहिका आली नाही म्हणून पीडितेच्या पतीने संताप व्यक्त केला. त्याने रुग्णवाहिकेचा काच फोडण्याची भाषा केली. तसेच आता रुग्णवाहिकेला कुठेही जाऊ देणार नाही, असं सुनील म्हणाला. सुनीलचा चढलेला पारा बघून रुग्णवाहिकेच्या चालकाने पोलिसांशी संपर्क केला (Man hijacked Ambulance for his corona positive pregnant wife).

पोलिसांकडून पीडितेला रुग्णालयात दाखल

सुनीलने जवळपास दोन तास गोंधळ घातला. अखेर घटनास्थळावर पोलीस दाखल झाले. त्यांनी सुनीलची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्याची समजूत घातल्यानंतर पोलिसांनी सुनीलच्या पत्नीला रुग्णालयात दाखल केलं.

हेही वाचा : “राऊतांनी फुकटचा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला असता तर अर्थव्यवस्थेला गती देता आली असती” प्रविण दरेकर कडाडले

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.