थुंकताना पाय घसरला, ग्रीलमध्ये गळा अडकून नवऱ्याचा मृत्यू, बायको घराबाहेर येईपर्यंत होत्याचं नव्हतं!

योगेश डोंगरे हा अल्केम कंपनीत एमआर म्हणून कार्यरत होता. शुक्रवारी रात्री तो आपल्या मित्रांसोबत पार्टी करायला गेला होता. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास तो एकटाच आपल्या दुचाकीवर घरी परतला. घरासमोर दुचाकी उभी करुन तो गुटखा थुंकायला गेला. मात्र मद्यधुंद असल्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो भिंतीतील लोखंडी ग्रीलमध्ये अडकला.

थुंकताना पाय घसरला, ग्रीलमध्ये गळा अडकून नवऱ्याचा मृत्यू, बायको घराबाहेर येईपर्यंत होत्याचं नव्हतं!
मध्य प्रदेशातील तरुणाचा ग्रिलमध्ये अडकून मृत्यू
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 12:32 PM

भोपाळ : मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये एका तरुणाला मद्यधुंद अवस्थेत गुटखा थुंकताना बाळगलेली हलगर्जी चांगलीच महागात पडली. घराच्या कम्पाऊण्डवरील ग्रीलमधून गुटखा थुंकताना तरुणाचा पाय घसरला. तरुणाचा गळा दोन ग्रीलमध्ये अडकल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. हा तरुण आपल्या मित्रांसोबत पार्टी करून आला तेव्हा दारुच्या नशेत होता. मात्र मद्यधुंद अवस्थेत झालेल्या निष्काळजीपणामुळे त्याला आपला जीव गमवावा लागला.

काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेशातील बैतुल येथील गोठाणा परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा एक वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) आपली बाईक घरासमोर उभी करुन गुटखा थुंकण्यासाठी गेला होता. दारुच्या नशेत तो बाउंड्री वॉलवरील लोखंडी ग्रीलवर पडला. ग्रीलमध्ये मान अडकून घशाला दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआर दारुच्या अंमलाखाली होता. शनिवारी पोस्टमार्टम केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

नेमकं काय घडलं?

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोठाणा येथे राहणारा योगेश डोंगरे हा अल्केम कंपनीत एमआर म्हणून कार्यरत होता. शुक्रवारी रात्री तो आपल्या मित्रांसोबत पार्टी करायला गेला होता. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास तो एकटाच आपल्या दुचाकीवर घरी परतला. घरासमोर दुचाकी उभी करुन तो गुटखा थुंकायला गेला. मात्र मद्यधुंद असल्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो भिंतीतील लोखंडी ग्रीलमध्ये अडकला. लोखंडी ग्रीलवर पडल्याने घशात अंतर्गत जखमा होऊन त्याचा मृत्यू झाला.

बायकोने कॉल केला आणि…

बराच वेळ घरी परत न आल्याने पत्नीने त्याच्या मोबाईलवर कॉल केला, तेव्हा मोबाईलची रिंग घरासमोरच वाजत असल्याचं त्यांच्या ध्यानात आलं. यानंतर कुटुंबीय घराबाहेर आले असता योगेशचा गळा लोखंडी ग्रीलमध्ये अडकलेला दिसला. यानंतर, कुटुंबीयांनी त्याला जिल्हा रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

एसडीओपी नितेश पटेल यांनी सांगितले की योगेश डोंगरे त्याच्या मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर घराजवळ आला होता. तिने एक ड्रिंकही घेतले होते. तो घराजवळ गुटखा थुंकण्यासाठी गेला असता पाय घसरल्याने त्याचा गळा ग्रीलमध्ये अडकला आणि गुदमरून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस सर्व मुद्यांवर तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

आई-बहिणीला दिलेल्या त्रासाचा वचपा, पॅरोलवर सुटलेल्या बापाची मुलाकडून हत्या

अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, पुण्यात जन्मदात्रीकडून तीन महिन्यांच्या बाळाचा खून

पत्नीच्या औषधोपचारासाठी पैसे नाहीत, नैराश्यातून पतीची गळफास घेत आत्महत्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.