धावत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची चाकू भोसकून हत्या, सात दिवसात तुरुंगात प्रियकराची आत्महत्या

आरोपी सागर सोनी मुस्कानवर प्रेम करत होता. मात्र तिने त्याला सोशल मीडियावर ब्लॉक केलं होतं. त्यामुळे दोघांमध्ये कुठलीही बातचित होऊ शकत नव्हती. त्याच रागातून सागरने मुस्कानची ट्रेनमध्ये हत्या केली होती.

धावत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची चाकू भोसकून हत्या, सात दिवसात तुरुंगात प्रियकराची आत्महत्या
प्रेयसीने ब्लॉक केल्याच्या रागात प्रियकराने तिचा जीव घेतला
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 8:00 AM

भोपाळ : इंदौर-बिलासपूर नर्मदा एक्स्प्रेसमध्ये प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकराने तुरुंगात आत्महत्या केली. जून महिन्याच्या सुरुवातीला 21 वर्षीय मुस्कान हाडा या तरुणीची हत्या करण्यात आली होती. धावत्या ट्रेनमध्ये चाकू भोसकून बॉयफ्रेण्ड सागर सोनीनेच तिची हत्या केली होती. आता सागरने तुरुंगात गळफास घेऊन आयुष्य संपवलं. केंद्रीय जेल अधीक्षकांच्या प्राथमिक तपासानंतर दोन तुरुंग अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. (Madhya Pradesh Boyfriend commits Suicide after Killing Girlfriend in Train)

नेमकं काय घडलं

एक जूनच्या रात्री इंदौर-बिलासपूर नर्मदा एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या 21 वर्षीय युवतीची हत्या झाली होती. इंदौरमध्ये राहणाऱ्या मुस्कान हाडा हिची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. धावत्या ट्रेनमध्ये चाकूने भोसकून तिची हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकर पसार झाला होता. पोलिसांनी आरोपी सागर सोनीला अटक केली.

प्रेयसीने ब्लॉक केल्याचा राग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सागर सोनी मुस्कानवर प्रेम करत होता. मात्र तिने त्याला सोशल मीडियावर ब्लॉक केलं होतं. त्यामुळे दोघांमध्ये कुठलीही बातचित होऊ शकत नव्हती. त्याच रागातून सागरने मुस्कानची ट्रेनमध्ये हत्या केली होती.

तुरुंगातच प्रियकराचा टीशर्टने गळफास

अटक झाल्यानंतर सागरची रवानगी सिहोर तुरुंगात करण्यात आली होती. मात्र 7 जूनला त्याने तुरुंगातच आपल्या टीशर्टने गळफास घेऊन आत्महत्या केली. केंद्रीय जेल अधीक्षकांच्या प्राथमिक तपासानंतर दोन तुरुंग अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. सिहोर जेलचे उप कारागृह अधीक्षक पीएन प्रजापती यांच्या माहितीनुसार हलगर्जी बाळगल्याने दोघा तुरुंग अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

पालघरमध्ये प्रेयसीला भिंतीत गाडलं

प्रेयसीने लग्नाचा तगादा लावल्यामुळे तिची हत्या करुन मृतदेह भिंतीत पुरल्याची धक्कादायक घटना पालघरमधील वाणगाव येथे घडली होती. आधी संबंधित तरुणी आणि आरोपी घरातून पळून गेले होते. मात्र, या काळात प्रियकराने तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह वाणगावमध्ये एका फ्लॅटच्या भिंतीत पुरल्याचे समोर आले. प्रियकराने हत्या केल्याचे कबूल केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

चार महिन्यांपासून मुलगी जिवंत असल्याचे भासवले

मुलगी चार महिन्यांपासून गायब असल्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेणे सुरु केले होते. पण मुलीचा शोध लागत नव्हता. या 4 महिन्यांमध्ये आरोपी प्रियकराने मुलीचे सोशल मीडिया अकाउंट वापरुन तसेच व्हॉट्सअ‌ॅपद्वारे मृत तरुणी जिवंत असल्याचे भासवले. आरोपी मुलीच्या व्हॉट्सअ‌ॅपवरुन मृत तरुणी बोलत असल्याचे भासवत तिच्या कुटुंबीयांशी बोलायचा. मात्र, शंका आल्यानंतर खरी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मृत मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली

संबंधित बातम्या :

लॉजवर बोलवून प्रेयसीची गळा दाबून हत्या, नाशिकमध्ये प्रियकराला बेड्या

चंदूचा मर्डर कर, मी तुला शय्यासुख देते, मित्राच्या प्रेयसीकडून सुपारी, बालमित्राची हत्या

(Madhya Pradesh Boyfriend commits Suicide after Killing Girlfriend in Train)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.