मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल, स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे (Madhya Pradesh chief minister security constable attempt suicide).

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्याचं टोकाचं पाऊल, स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 3:20 PM

भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे भोपाळमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा पथकातील कर्मचाऱ्याने अशी अचानकपणे हत्या केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या सुरक्षा कर्मचाऱ्याचं नाव अजय सिंह असं असल्याची माहिती समोर आली आहे (Madhya Pradesh chief minister security constable attempt suicide).

अजय ड्यूटीवर न आल्याने ऑफिसमधून त्यांना फोन

अजय सिंह हे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सुरक्षा पथकात गेल्या सहा महिन्यांपूर्वी तैनात होते. अजय हे बुधवारी (30 जून) नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी ड्युटीवर तैनात होणार होते. ते ड्यूटीवर नेहमी वेळेवर हजर राहायचे. मात्र, बुधुवारी सकाळी बराच काळ उलटून गेला तरी ते आले नव्हते. त्यामुळे सिक्योरिटी ऑफिसमधून अजय यांना फोन करण्यात आला. मात्र, अजय फोन उचलत नव्हते (Madhya Pradesh chief minister security constable attempt suicide).

अजयचे नातेवाईक घरी गेल्यावर आत्महत्येची माहिती उघड

यानंतर ऑफिसमधून अजय यांच्या नातेवाईकांना फोन लावण्यात आला. त्या नातेवाईकांनी भोपाळमध्ये राहत असलेल्या नातेवाईकांना फोन करुन अजयच्या घरी जावून चौकशी करण्यास सांगितलं. त्यानुसार अजय यांचे भोपाळमधील एक नातेवाईक त्यांच्या घरी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर घराचा दरवाजा आतमधून लॉक आहे हे अजय यांच्या नातेवाईकाला लक्षात आलं. त्यांनी घराच्या मागच्या बाजूने घरात ढुंकून पाहिलं तर त्यांच्या पायाखालची जमिनच घसरली. कारण त्यांच्यासमोर अजय यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.

सगळं सुरळीत असताना आत्महत्या का?

अजय हे मुळचे मध्य प्रदेशच्या विदिशा येथील शमशाबादचे रहिवासी होते. ते नोकरीनिमित्त भोपाळ येथे राहत होते. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलगीही भोपाळमध्ये वास्तव्यास होते. पण एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची पत्नी आणि मुलगी विदिशा येथे गेले होते. अजय देखील सुट्टी घेऊन संबंधित कार्यक्रमासाठी जाणार होते. सगळं सुरळीत सुरु असताना अजय यांनी आत्महत्या केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलिसांकडून तपास सुरु

अजय यांच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी अजय यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. अजय यांनी त्यांच्या सर्व्हिस रिवॉल्वहरने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. पोलीस सध्या त्यांच्या भावाचा जबाब नोंदवत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे.

हेही वाचा : “ममतादीदींनी ईडी आणि सीबीआयरुपी सुल्तानशाहीवर विजय मिळवला, महाराष्ट्रानेही तोच मार्ग स्वीकारणे गरजेचे”

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.