फिरायला गेलेल्या विद्यार्थिनीवर तीन मित्रांकडूनच गँगरेप, अश्लील व्हिडीओ बनवल्याचाही दावा

खासगी महाविद्यालयात प्रथम वर्षाचं शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आपली मैत्रीण आणि तीन तरुणांसह मांडव भागात फिरायला गेली होती. रात्री घरी येताना तिला एका तरुणाने कोल्डड्रिंकमधून अंमली पदार्थ घालून दिला.

फिरायला गेलेल्या विद्यार्थिनीवर तीन मित्रांकडूनच गँगरेप, अश्लील व्हिडीओ बनवल्याचाही दावा
विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 2:42 PM

भोपाळ : मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंमली पदार्थ देऊन तिघा मित्रांनीच तिच्यावर गँगरेप केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या मैत्रिणीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत.

नेमकं काय घडलं?

23 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका खासगी महाविद्यालयात प्रथम वर्षाचं शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आपली मैत्रीण आणि तीन तरुणांसह मांडव भागात फिरायला गेली होती. रात्री घरी येताना तिला एका तरुणाने कोल्डड्रिंकमधून अंमली पदार्थ घालून दिला. ती बेशुद्ध झाल्यानंतर तिघे आरोपी तिला एका फ्लॅटमध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी आळीपाळीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे.

अश्लील फोटो-व्हिडीओ काढल्याचा आरोप

पीडित विद्यार्थिनीने लसुडिया पोलीस स्थानकात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पीडितेच्या मैत्रिणीसह अन्य तिघा मित्रांवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरु आहे. आरोपी आशिष, निकुल आणि हितेश यांनी आपला अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढल्याचा आरोपही तिने केला आहे.

बीडमध्ये विवाहितेवर बलात्कार

दुसरीकडे, महाराष्ट्रीतील बीड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत आहेत. 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार झाल्याची घटना ऐन रक्षाबंधनच्या दिवशी समोर आली होती. सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याची धमकी देत नात्यातील व्यक्तीनेच महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप झाला.

जालन्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

दरम्यान, जालना जिल्ह्यातील बदनापुर तालुक्यातील कंडारी खुर्द येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटनाही नुकतीच समोर आली होती. मुलगी एकटी असल्याचे लक्षात येताच आरोपी सोपान ढाकणे आणि शंभु ढाकणे या दोघांनी मुलीला निर्जन स्थळी नेले. तिथे तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या घटनेबद्दल कुणाला सांगू नको, म्हणून पुन्हा धमकी दिल्याचा आरोप आहे.

संबंधित बातम्या :

जीवे मारण्याची धमकी, जालन्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, एकाला अटक

बीडमध्ये 28 वर्षीय विवाहितेवर बलात्कार, सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्याची धमकी

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.