बहिणींना माझं तोंडही दाखवू नका, प्रेयसीला अंत्यसंस्काराला बोलावू नका, सुसाईड नोट लिहित जिम प्रशिक्षकाचा गळफास

प्रेयसीला माझ्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ देऊ नका, हीच माझी अंतिम इच्छा आहे, ती पूर्ण केली नाही, तर माझा आत्मा कायम भटकत राहील. बाकी या कोणावर माझी नाराजी नाही, असं तरुणाने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

बहिणींना माझं तोंडही दाखवू नका, प्रेयसीला अंत्यसंस्काराला बोलावू नका, सुसाईड नोट लिहित जिम प्रशिक्षकाचा गळफास
मध्य प्रदेशातील तरुणाची गळफास घेत आत्महत्या
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 11:26 AM

भोपाळ : जिम प्रशिक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धाकटा भाऊ क्रिकेट खेळण्यासाठी बोलवायला त्याच्या खोलीत गेला, तेव्हा हा प्रकार समोर आला. माझ्या दोन्ही बहिणींना माझा चेहरा दाखवू नका, तसंच माझ्या प्रेयसीला अंत्यसंस्काराना बोलवू नका. माझी ही अंतिम इच्छा पूर्ण केली नाहीत, तर माझी आत्मा फिरत राहील, असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. मध्य प्रदेशातील इंदौर शहरात कँटोन्मेंट परिसरात हा प्रकार घडला.

धाकट्या भावाने सर्वप्रथम मृतदेह पाहिला

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. संयोगितागंज पोलिसांनी सांगितले की, मृत तरुणाचे नाव गोपाल वर्मा आहे. तो जिम ट्रेनर होता. गोपालला नितेश आणि अंकुश असे दोन भाऊ आहेत. घटनेच्या वेळी त्याचे आई -वडीलही घरात होते. त्याचा मृतदेह रविवारी सकाळी त्याचा भाऊ नितेशने फासावर लटकलेल्या अवस्थेत पाहिला. यानंतर कुटुंबीयांनी त्याला लगेचच जवळच्या रुग्णालयात नेले, परंतु त्याचा मृत्यू झाला होता.

चुलत बहिणींशी वाद

जिम प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या गोपाळचे काम काही महिन्यांपासून बरे चालले नव्हते. तसेच गेल्या काही काळापासून त्याच्या काकांच्या कुटुंबासोबत मालमत्तेवरुन वाद सुरु होते. त्याच्या काकांना दोन मुली आहेत, ज्यांचे लग्न झाले आहे. या वादात त्याच्या दोन्ही चुलत बहिणीही मध्ये पडत होत्या. यामुळे तो चुलत बहिणींवरही काही दिवस रागावला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोट जप्त केली आहे.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं आहे?

“मी जे करत आहे, स्वतःच्या मर्जीने करत आहे. माझी शेवटची इच्छा हीच आहे की माझ्या दोन्ही बहिणी गोलू आणि मुन्नू यांना माझा चेहराही दाखवू नका. माझी त्या दोघींवर कोणतीही नाराजी नाही. मी जे करत आहे, स्वतःच्या मर्जीने करत आहे. प्रिती सिलावटलाही माझ्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊ देऊ नका, हीच माझी अंतिम इच्छा आहे, ती पूर्ण केली नाही, तर माझा आत्मा कायम भटकत राहील. बाकी या कोणावर माझी नाराजी नाही.” असं गोपालने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

संबंधित बातम्या :

सात जणांची नावं, सुसाईड नोट सेफ्टी पिनने गाठोड्याला अडकवली, कोल्हापुरात महिलेची नदीत आत्महत्या

ठाण्यात महिलेचा गळफास, आत्महत्येपूर्वी मैत्रिणींना व्हिडीओ पाठवून पतीवर धक्कादायक आरोप

भाजयुमोच्या 28 वर्षीय नेत्याची आत्महत्या, नस कापून गळफास, सुसाईड नोटमध्ये प्रेयसीवर आरोप

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.