अकरावीतील विद्यार्थिनीला हॉटेलवर बोलावलं, गुंगीचं औषध पाजून 22 वर्षीय तरुणाकडून बलात्कार

आरोपीने आधी अल्पवयीन मुलीला इन्स्टाग्रामवर मैत्रीच्या जाळ्यात अडकवले, नंतर मैत्रीचा गैरफायदा घेत तिला भेटायला बोलावले. तरुणाने पीडितेला हॉटेलमध्ये भेटायला येण्यास सांगितले होते. तिथेच त्याने तिला कोल्ड ड्रिंक प्यायला दिले.

अकरावीतील विद्यार्थिनीला हॉटेलवर बोलावलं, गुंगीचं औषध पाजून 22 वर्षीय तरुणाकडून बलात्कार
संग्रहित फोटो
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 3:06 PM

भोपाळ : इन्स्टाग्राम (Instagram) सारख्या सोशल मीडिया अकाऊण्टवर झालेली ओळख एका अल्पवयीन मुलीला चांगलीच महागात पडली. मुलीला हॉटेलमध्ये बोलावून कोल्ड ड्रिंकमधून (Cold Drink) गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेत असताना तिच्यासोबत मद्यधुंद अवस्थेत लैंगिक अत्याचार करण्यात आला. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदौरमध्ये भंवरकुआं पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. संबंधित पीडित अल्पवयीन मुलीची ओळख इन्स्टाग्रामवरुन 22 वर्षीय तरुणाशी झाली होती. भेटायच्या बहाण्याने बोलावून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर मद्यपान करुन आरोपी तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडिता महाविद्यालयात इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी आहे. पोलिसांनी पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेशातील इंदौर शहरातील भंवरकुआं पोलीस स्टेशन परिसरात राहणारी संबंधित विद्यार्थिनी इयत्ता अकरावीत शिकते. तिची विनायक गिडवानी नावाच्या तरुणाशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री झाली. हा तरुण बेराठी कॉलनीत राहत होता. हा तरुण जितका साधा-सरळ दिसत होता, तितकाच त्याचा हेतू धोकादायक होता.

मैत्रीच्या जाळ्यात अडकवून हॉटेलवर बोलावले

आरोपीने आधी अल्पवयीन मुलीला इन्स्टाग्रामवर मैत्रीच्या जाळ्यात अडकवले, नंतर मैत्रीचा गैरफायदा घेत तिला भेटायला बोलावले. तरुणाने पीडितेला हॉटेलमध्ये भेटायला येण्यास सांगितले होते. तिथेच त्याने तिला कोल्ड ड्रिंक प्यायला दिले. मात्र त्याने कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध मिसळले होते. त्यामुळे कोल्ड ड्रिंक प्यायल्यानंतर मुलगी बेशुद्ध झाली.

मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर तरुणाने दारू पिऊन तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणाबाबत अल्पवयीन मुलाचे म्हणणे आहे की, तिने पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस उपनिरीक्षक भंवरकुवान मनिषा यांनी सांगितले की, पोलिसांनी बलात्कारासह पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

पतीच्या बर्थडेनिमित्त हॉटेलात जेवायला, पुण्यात विवाहितेवर पाच जणांचा गँगरेप

गायीला वाचवण्याच्या नादात भीषण अपघात, पिक अप व्हॅन दुभाजकावर धडकून उलटली

भयंकर! दुसरीही मुलगी झाल्याचा राग, नवऱ्यानेच बायकोच्या गुप्तांगात लोखंडी रॉड खुपसला

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.