मोठ्या जाऊबाईंच्या दागिन्यांचा मत्सर, धाकटीने भावासोबत प्लॅन आखला, कोट्यवधींच्या खजिन्यावर डल्ला
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, चोरट्यांनी सोने, हिरे, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरली होती. रोहितने सांगितले की मी, वडील आणि भाऊ दुकानात गेलो होतो. घरी आई कोमल, पत्नी, धाकट्या भावाची पत्नी आणि मुलगी क्रिशा होती.
भोपाळ : मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये चंदन नगर पोलीस स्टेशन परिसरातील गुमास्ता नगरात एका भांडे व्यापाऱ्याच्या घरी झालेल्या 85 लाख रुपयांहून अधिक किमतीच्या चोरीचा खुलासा केला आहे. पोलिसांनी महिलेसह तीन आरोपींना अटक केली आहे. यासह त्यांच्याकडून चोरीचा मालही जप्त करण्यात आला आहे. अटक केलेली महिला सराईत गुन्हेगार नाही, ती घरची धाकटी सून आहे. तिला मोठ्या जाऊबाईंच्या संपत्तीचा हेवा वाटत होता. त्यामुळे भावाच्या मदतीने तिने घर लुटल्याचा आरोप आहे. या घटनेत महिलेच्या पतीचा हात नाही. पोलिसांनी आरोपींची रवानगी तुरुंगात केली आहे.
काय आहे प्रकरण?
13 ऑक्टोबर 2021 रोजी चंदन नगर पोलीस स्टेशन परिसरातील गुमस्ता नगर येथे राहणाऱ्या रोहित यांनी घरात चोरी झाल्याची माहिती दिली होती. यानंतर एसपी महेशचंद्र जैन यांनी पोलिसांचे पथक घरी पाठवले. घटना मोठी असल्यामुळे तीन पोलीस ठाण्यांचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. यामध्ये चंदन नगर, अन्नपूर्णा आणि द्वारकापुरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा बारकाईने तपास सुरू केला. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, चोरट्यांनी सोने, हिरे, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरली होती. रोहितने सांगितले की मी, वडील आणि भाऊ दुकानात गेलो होतो. घरी आई कोमल, पत्नी, धाकट्या भावाची पत्नी आणि मुलगी क्रिशा होती.
नेमकं काय घडलं?
तक्रारदार रोहितने सांगितले की, दुपारी दोनच्या सुमारास पत्नी काही कामानिमित्त बाजारात गेली होती. संध्याकाळी जवळपास सहा वाजताच्या सुमारास आईची तब्येत बिघडली तेव्हा धाकटी भावजय माधुरी आणि तिची मुलगी क्रिशा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. सुमारे दोन तासांनंतर जेव्हा पत्नी आणि मुलगी आईसोबत परत आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आहे आणि घरात चोरी झाली आहे.
एक कोटींपेक्षा अधिक संपत्ती
दागिने जुने आणि वडिलोपार्जित असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. अशा परिस्थितीत त्यांची अचूक किंमत सांगणे कठीण आहे पण त्यांची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचा अंदाज त्याने वर्तवला. या खळबळजनक घटनेबद्दल सुरुवातीपासूनच निकटवर्तीयांवर संशय होता.
पोलिसांनी याविषयी घरच्या मोलकरणींची अडीच तास चौकशी केली होती. यासोबतच कुटुंबातील इतर सदस्यांचीही चौकशी करण्यात आली. यानंतर सीसीटीव्ही व्हिडिओ स्कॅन करण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती देताना एसपी महेशचंद जैन म्हणाले की, घटनेच्या दिवशी दोन लोक घरात फिरताना दिसले. 20 मिनिटांनी हे लोक घर सोडून काही अंतरावर गेले आणि रिक्षाने निघून गेले.
सीसीटीव्ही फूटेजमध्ये काय दिसलं
घरासमोरील फुटेजमध्ये दोघांची ओळख पटू शकली नाही. पोलीस तपासात त्या दोघांशी साधर्म्य असलेल्या व्यक्ती दसरा मैदानावर रिक्षामधून खाली उतरताना आणि नंतर अॅक्टिवावर स्वार होताना दिसल्या होत्या. कॅमेऱ्यांची छाननी केली असता असे दिसून आले की, त्यांच्या शरीरयष्टीशी मिळत्याजुळत्या व्यक्तींपैकी एक जण घरात ये -जा करत असे. त्याचे नाव वैभव आहे. वैभवला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली गेली, तेव्हा त्याने सत्याचा उलगडा केला. वैभव हा घरची धाकटी सून माधुरीचा भाऊ होता.
धाकट्या सुनेचा प्लॅन
घटनेच्या दिवशी माधुरी म्हणाली की दादा, तुम्ही मला मदत करा. आज घरी कोणी नाही. मी माझ्या सासू बरोबर डॉक्टरकडे जात आहे. तुम्ही घरातून सोने आणि पैसे चोरा. सुनेने पद्धतशीरपणे घराचा दरवाजा उघडा ठेवला होता जेणेकरून सहज आत प्रवेश करुन चोरी करता येईल. चोरीमध्ये सहकार्य केल्याबद्दल आरोपी वैभवचा नोकर अरबाज यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी माधुरीसह तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक किलो 600 ग्रॅम सोन्याचे दागिने, 40 ग्रॅम हिऱ्याचे दागिने, 600 ग्रॅम चांदीचे दागिने आणि 20 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरण रचणारा मास्टरमाईंड त्याच घराची सून होती. सध्या पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, धाकटी सून मोठ्या जावेच्या संपत्तीचा हेवा करत होती. म्हणून तिने आपल्या भावासोबत पूर्ण योजना बनवली होती.
संबंधित बातम्या :
पुण्यात महिला लेफ्टनंट कर्नलची आत्महत्या, हिमाचलमधील ब्रिगेडियरवर गुन्हा
जुळ्या भावांंचा एकत्रच अंत, 25 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू, मध्यरात्री एक वाजता नेमकं काय घडलं?
VIDEO | दुर्गा मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीला गालबोट, भरधाव गाडीने भाविकांना उडवलं