महादेव बेटिंग अ‍ॅपचा मास्टरमाइंड सौरभ चंद्राकरच्या मुसक्या आवळल्या, लाखो लोकांची अब्जावधींमध्ये फसवणूक…

sourabh chandrakar arrest: 5 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने महादेव बेटिंग अ‍ॅपसह 22 बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप आणि वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. ईडीच्या शिफारशींनंतर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69ए अंतर्गत आदेश जारी करण्यात आले.

महादेव बेटिंग अ‍ॅपचा मास्टरमाइंड सौरभ चंद्राकरच्या मुसक्या आवळल्या, लाखो लोकांची अब्जावधींमध्ये फसवणूक...
sourabh chandrakar
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 11:25 AM

mahadev betting app saurabh chandrakar: महादेव बेटिंग अ‍ॅपचा मास्टरमाइंड सौरभ चंद्राकर अखेर जाळ्यात आला आहे. त्याला दुबईत अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जारी केलेल्या इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसनंतर सौरभ चंद्राकरवर कारवाई करण्यात आली आहे. आता सौरभ याला आठवडाभरात भारतात आणले जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली. चंद्राकर याच्यावर बेटिंग अ‍ॅपद्वारे लाखो लोकांची अब्जावधींमध्ये फसवणूक केल्याचा आरोप आहे.

बॉलीवूड स्टारची चौकशी

महादेव अ‍ॅपचा मास्टरमाइंड सौरभ चंद्राकर याचेही डी कंपनीशी म्हणजे दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंध असल्याचा आरोप आहे. फसवणूक प्रकरणात महादेव अ‍ॅपवर देशातील अनेक राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात बॉलीवूडमधील स्टारची चौकशी झाली आहे. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांची या प्रकरणात चौकशी झाली आहे. कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खान यांची दुबईत एका लग्नात फेब्रुवारी महिन्यात परफॉर्म केले होते. त्यानंतर त्यांचीही ईडीने चौकशी केली होती. छत्तीसगडचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ॲप प्रवर्तकांकडून कथितपणे 508 कोटी रुपये घेतल्याचा आरोप झाला होता. मात्र, बघेल यांनी आरोप फेटाळून लावले.

केंद्र सरकारने घातली बंदी

5 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने महादेव बेटिंग अ‍ॅपसह 22 बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप आणि वेबसाइट ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. ईडीच्या शिफारशींनंतर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69ए अंतर्गत आदेश जारी करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

महादेव बेटिंग अ‍ॅपच्या प्रमोटर्सविरोधात मुंबईत 8 नोव्हेंबर 2023 रोजी गुन्हा दाखल झाला होता. आरोपींवर फसवणूक आणि जुगार खेळण्याचे आरोप करण्यात आले होते. माटुंगा पोलीस ठाण्यात सौरभ चंद्राकर, रवी उप्पल यांच्यासह 30 पेक्षा जास्त जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. एफआयआरनुसार आरोपींवर 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण मुंबई क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आले. त्यानंतर या प्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी अ‍ॅपचे प्रमोटर्स विरोधात कारवाईची मागणी याचिकेत केली होती.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.