Jalgaon CCTV Video: सायकलवाल्याला वाचवण्याच्या नादात पोलीस व्हॅनची कारला धडक, ऑटोवाल्याचा मूर्खपणा भोवला, अपघात सीसीटीव्हीत कैद

भुसावळ रोडवरील खेडी पेट्रोल पंपाजवळ पोलिसांच्या वाहनाने व्हॅनला धडक दिली. यात पाच जण जखमी झाले आहेत. जळगावातून मुक्ताईनगरला आरसीपीचे प्लाटून घेऊन जात असताना पोलीस वाहनाचा अपघात झाला.

Jalgaon CCTV Video: सायकलवाल्याला वाचवण्याच्या नादात पोलीस व्हॅनची कारला धडक, ऑटोवाल्याचा मूर्खपणा भोवला, अपघात सीसीटीव्हीत कैद
जळगावात पोलीस व्हॅनचा विचित्र अपघातImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 7:37 AM

जळगाव : सायकलस्वार तरुणाला वाचवण्याच्या नादात पोलीस व्हॅनने (Police Van) कारला धडक दिली. जळगावमध्ये भुसावळ रोडवर हा विचित्र अपघात (Jalgaon Accident) झाला. ऑटो रिक्षा चालकाच्या मूर्खपणामुळे हा भीषण अपघात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात (CCTV Camera) कैद झाली आहेत. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. प्रवासी उतरवण्यासाठी ऑटोवाल्याने रहदारीच्या बाजूचा दरवाजा अचानक उघडला. दाराची धडक लागल्यामुळे रस्त्यावर मागून येत असलेला सायकलस्वार खाली पडला. तर भर रस्त्यात पडलेल्या सायकलस्वाराला वाचवताना पोलीस वाहन समोरच्या व्हॅनवर जाऊन आदळले आणि हा विचित्र अपघात झाला.

भुसावळ रोडवरील खेडी पेट्रोल पंपाजवळ पोलिसांच्या वाहनाने व्हॅनला धडक दिली. यात पाच जण जखमी झाले आहेत. जळगावातून मुक्ताईनगरला आरसीपीचे प्लाटून घेऊन जात असताना पोलीस वाहनाचा अपघात झाला.

नेमकं काय घडलं?

ऑटो रिक्षा चालकाने प्रवासी उतरवण्यासाठी ड्रायव्हरच्या साईडचे फाटक उघडले. या फाटकाची धडक लागल्यामुळे रस्त्यावर मागून आलेला सायकलस्वार खाली पडला. रस्त्यावर पडलेल्या सायकलस्वाराला वाचवताना पोलीस वाहनाने दिशा वळवली आणि ते समोरच्या व्हॅनवर जाऊन आदळले.

अपघात सीसीटीव्हीत कैद

या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा व्हिडिओ समोरील दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून जळगाव जिल्ह्यातील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रहदारीच्या बाजूने गाडीतून उतरणं टाळावं, हा धडा या अपघातामुळे अधोरेखित झाला आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

VIDEO : टिटवाळ्यात दीड वर्षाच्या चिमुकल्याला टेम्पोने चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद

Car Accident | इंटरव्ह्यूहून परत येताना काळाचा घाला, कार दुभाजकाला धडकून आर्किटेक्टचा मृत्यू

Malegaon Accident | भरधाव ट्रकने चिरडलं, चार वर्षांच्या चिमुरड्याने वडिलांदेखत प्राण सोडले

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.