कंटेनर गेटला घासत नाही ना? ड्रायव्हर उतरताच गाडी अचानक पुढे, गेटमध्ये अडकून जागीच मृत्यू

गेट आणि गाडीमध्ये अडकून कंटेनर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. खालापूर तालुक्यातील वावोशी जवळील हुतामाकी कंपनीमध्ये हा प्रकार घडला

कंटेनर गेटला घासत नाही ना? ड्रायव्हर उतरताच गाडी अचानक पुढे, गेटमध्ये अडकून जागीच मृत्यू
गेट आणि कंटेनरमध्ये अडकून चालकाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 9:30 AM

रायगड : काळ कधी, कसा, कुठे घाव घालेल, याचा नेम नाही. याचा प्रत्यय देणारी धक्कादायक घटना रायगड जिल्ह्यातून समोर आली आहे. गेट आणि गाडीमध्ये अडकून कंटेनर चालकाचा मृत्यू (Container Driver Death) झाल्याचा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला आहे. आपली गाडी गेटला घासत नाही ना, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न ड्रायव्हर मोहम्मद करत होता. त्यासाठी कंटेनर न्यूट्रलला टाकून तो खाली उतरला. मात्र याच वेळी गाडी अचानक पुढे गेली (Accident) आणि होत्याचं नव्हतं झालं. रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यातील (Khalapur Raigad) वावोशी जवळील हुतामाकी कंपनीमध्ये हा प्रकार घडला. या घटनेमुळे मोहम्मदच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

गेट आणि गाडीमध्ये अडकून कंटेनर चालकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. खालापूर तालुक्यातील वावोशी जवळील हुतामाकी कंपनीमध्ये हा प्रकार घडला. कंटेनरचा ड्रायव्हर आपली गाडी गेटला घासत नाही ना? याचा अंदाज घेण्यासाठी न्यूट्रल करुन खाली उतरला.

चालक उतरताच गाडी सरकली

चालक उतरल्यानंतर गाडी अचानक पुढे गेली. त्यामुळे मोहम्मद गेट आणि गाडी यांच्या दरम्यान अडकला. यामध्ये दुर्दैवाने त्याचा जागीच करुण अंत झाला. ही घटना आज (बुधवारी) सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

ज्या अपघातात अभिनेता दीप सिद्धूचा अंत झाला, त्या गाडीची अवस्था दाखवणारा व्हिडीओ पाहा

कार अपघातात जागीच चार जण ठार; वाशिम-शेलुबाजार मार्गावर अपघात, लग्न आटोपून परतताना कारची ट्रॅक्टरला धडक

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर सात गाड्यांचा विचित्र अपघात, दोन ट्रकमध्ये चिरडलेल्या कारमधील चौघे जागीच ठार

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....