पैशांच्या पावसाचा हव्यास, भाच्याने मावशीला घनदाट जंगलात जिवंत जाळलं, मृतदेह पुरला

51 वर्षीय महिलेला तिच्या भाच्यानं गोड बोलून जंगलात नेलं. पैशांचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून त्याने मावशीला जिवंत जाळलं. त्यानंतर एका खड्ड्यात तिचा मृतदेह पुरला.

पैशांच्या पावसाचा हव्यास, भाच्याने मावशीला घनदाट जंगलात जिवंत जाळलं, मृतदेह पुरला
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 1:38 PM

जळगाव : पैशांच्या पावसाच्या आमिषाने जळगावात महिलेला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मांत्रिकासह महिलेच्या चुलत भाच्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. महिलेला घनदाट जंगलात नेऊन भाच्याने मांत्रिकाच्या मदतीने अघोरी प्रकार केल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण

51 वर्षीय महिलेला तिच्या भाच्यानं गोड बोलून जंगलात नेलं. पैशांचा पाऊस पाडण्याच्या अंधश्रद्धेतून त्याने मावशीला जिवंत जाळलं. त्यानंतर एका खड्ड्यात तिचा मृतदेह पुरला. माया दिलीप फरसे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी संतोष मुळीक या मांत्रिकासह फरसेंचा चुलत भाचा अमोल दांडगे याला ताब्यात घेतलं आहे.

माया फरसे या जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातील क्रांती चौक भागात राहत होत्या. त्या सारथी पापड कारखान्यात काम करत होत्या.

घटनेच्या दिवशी काय घडलं

घटनेच्या दिवशी म्हणजेच 15 डिसेंबरला माया फरसेवनेहमीप्रमाणे सकाळी 9:30 वाजता कारखान्यात कामाला जाण्यासाठी निघाल्या. मात्र संध्याकाळ झाल्यानंतरही त्या घरी परत आल्या नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरु केली.

बराच वेळ शोध घेतल्यानंतरही नातेवाईकांना त्या सापडल्या नाहीत. अखेर त्यांच्या पतीसह कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन त्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

सीसीटीव्हीमध्ये भाच्याचं बिंग फुटलं

पोलिसांनी जळगाव शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता माया फरसे आणि त्यांचा चुलत भाचा अमोल दांडगे एकत्र चालताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी अमोलला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. पैशांचा पाऊस पाडण्याच्या हव्यासातून अमोलने मांत्रिकासोबत मावशीला घनदाट झाडीत नेऊन जिवंत जाळलं. यानंतर जंगल परिसरातच तिचा मृतदेह निर्जन जागी पुरल्याचं समोर आलं आहे.

संबंधित बातम्या :

गोव्यातील नामांकित रेस्टॉरंटमध्ये परदेशी युवतीवर लैंगिक अत्याचार, दोघा कर्मचाऱ्यांना बेड्या

‘साहब आपके कॉलर पर किडा है’ , असे म्हणत नोकरानेच हिसकावली मालकाची सोनसाखळी

मुलीनं धाव घेतली त्यावेळेस टोळकं तिच्या बापावर वार करत होतं, भाजप नेत्याच्या हत्येचा थरारक घटनाक्रम

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.