AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur | संघ मुख्यालयाची रेकी करणारा नागपूर एटीएसच्या ताब्यात, रईस शेखला काश्मिरात बेड्या

संघ बिल्डिंग आणि हेडगेवार स्मृती भवनाची रेकी करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला काश्मीरमधून दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याला प्रॉडक्शन वॉरंटवर नागपुरात आणण्यात आले असून त्याची चौकशीही सुरु आहे

Nagpur | संघ मुख्यालयाची रेकी करणारा नागपूर एटीएसच्या ताब्यात, रईस शेखला काश्मिरात बेड्या
नागपूर संघ कार्यालयाची अतिरेकीकडून रेकीImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 8:26 AM

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय (Nagpur RSS Headquarters) आणि स्मृती मंदिर परिसराची रेकी करणारा दहशतवादी (Terrorist) अखेर नागपूर एटीएसच्या ताब्यात आलाआहे. नागपूर दहशतवाद विरोधी पथकाने काश्मिरमध्ये (Kashmir) जाऊन रईस शेखला अटक केली आहे. जानेवारी महिन्यात रईस अहमद शेख सदाउल्ला शेख याला काश्मिर पोलिसांनी अटक केली होती. 15 जुलै 2021 रोजी नागपुरात येऊन रईस शेखने संघ मुख्यालय, स्मृती मंदिर परिसराची रेकी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर नागपुरात कोतवाली पोलिसांनी रईस शेखच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर काश्मिरला जाऊन नागपूर एटीएसने त्याला ताब्यात घेतला. दहशतवादी रईस शेखची सध्या एटीएसकडून कसून चौकशी सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

संघ बिल्डिंग आणि हेडगेवार स्मृती भवनाची रेकी करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याला काश्मीरमधून दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याला प्रॉडक्शन वॉरंटवर नागपुरात आणण्यात आले असून त्याची चौकशीही सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव रईस अहमद शेख असदुल्ला शेख (वय 26 वर्ष, रा. खाटी अवंतीपोरा, पुलवामा) असल्याचे सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा

जैशच्या हस्तकाची सूचना

पाकव्याप्त काश्मीरमधून जैशचा हस्तक उमरच्या सांगण्यावरून रईस जुलैमध्ये नागपुरात आला होता. संघाची दोन्ही प्रमुख ठिकाणे पाहिल्यानंतर ते काश्मीरला परतले. सप्टेंबर 2021 मध्ये रईसला काश्मीर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली होती.

संशय टाळण्यासाठी युक्ती

मिलिटरी इंटेलिजन्स टीमने चौकशी केली असता, रईसने जुलैमध्ये नागपूरला गेल्याचे सांगितले होते. कोणीही त्याच्यावर संशय घेऊ नये, म्हणून श्रीनगर ते दिल्ली, दिल्ली ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर अशी फ्लाईट बुक करण्यात आली होती. सेंट्रल एव्हेन्यू रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये त्याने रूम बुक केली. रिक्षाने संघ भवन आणि तिथून हेडगेवार भवनला तो गेला होता.

दोन्ही ठिकाणांची रेकी करून मोबाईलवर व्हिडीओ तयार करून त्याने तो उमरला पाठवला. यानंतर नागपूर पोलिसांचे आणि महाराष्ट्र एटीएस आणि आयबीला माहिती मिळाली. एका पथकाने श्रीनगरला जाऊन त्याची चौकशीही केली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास नागपूर एटीएसकडे सोपवण्यात आला. दोन दिवसांपूर्वी एटीएसच्या पथकाने त्याला प्रॉडक्शन वॉरंटवर नागपुरात आणले होते.

वाईट कॉलिटीच्या व्हिडीओमुळे ओरडा

यापूर्वी पोलिसांनी सांगितले होते की पाकव्याप्त काश्मीरमधून उमरच्या सूचनेनुसार रईस येथे रेकी करण्यासाठी आला होता. नागपूरला पोहोचल्यानंतर एक व्यक्ती संपर्क करेल, असे उमरने त्याला सांगितले होते. त्याच्या मदतीनेच त्याला रेकीचे काम करावे लागणार होते, मात्र तो नागपूरला पोहोचला तेव्हा कोणीही मदतीला आले नाही. अशा परिस्थितीत त्याने स्वत: दोन्ही ठिकाणी जाऊन व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. व्हिडिओ निकृष्ट दर्जाचे होते आणि ते दुरुन घेतले गेले. त्यामुळे उमरने त्याला फटकारले पण भीतीपोटी त्याने पुन्हा व्हिडीओ काढला नाही आणि फोन बंद केला.

मात्र रईस केवळ तपास यंत्रणांची दिशाभूल करत असल्याचं बोललं जातं. त्याने दोन्ही ठिकाणांचा बारकाईने मागोवा घेतला आणि पीओकेमध्ये बसलेल्या जैशच्या हँडलरला सर्व माहिती शेअर केली. रईसच्या मदतीसाठी नागपुरात कोणाला पाठवले जाणार होते, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. याबाबत सध्या संपूर्ण गुप्तता पाळण्यात येत आहे

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....