Sword Cake Cutting | बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याचे तलवारीने केक कटिंग, पालघरमध्ये गुन्हा

वाढदिवस साजरा करत असताना बजरंग दलाचे पदाधिकारी मुकेश दुबे यांनी तलवारीने केक कापला होता. . हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने मुकेश दुबे यांना अंतरिम जामीन दिला आहे.

Sword Cake Cutting | बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याचे तलवारीने केक कटिंग, पालघरमध्ये गुन्हा
बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याने तलवारीने केक कापला
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 1:08 PM

मोहम्मद हुसेन खान, पालघर : वाढदिवसाला तलवारीने केक कापणे बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. बजरंग दलाचे पदाधिकारी मुकेश दुबे (Mukesh Dube) यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघरमध्ये तलवारीने केक कटिंग करत दुबेंनी फेसबुक लाईव्हही केले होते. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी दुबेंवर कारवाई केल्याची माहिती आहे.

मुकेश दुबेंवर गुन्हा दाखल

वाढदिवस साजरा करत असताना बजरंग दलाचे पदाधिकारी मुकेश दुबे यांनी तलवारीने केक कापला होता. त्यानुसार भारतीय सशस्त्र अधिनियम 4, 25 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे पालघरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तलवारीने केक कापतानाचा व्हिडीओ व्हायरल

दुबेंनी फेसबुक लाईव्ह करत बर्थडे केक कापला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या प्रकरणी  न्यायालयाने मुकेश दुबे यांना अंतरिम जामीन दिला आहे.

औरंगाबादमध्येही तलवारीने केक कटिंग

नुकतंच, तलवारीने केक कापून बर्थडे सेलिब्रेट केल्याने औरंगाबादमध्ये बर्थडे बॉयला पोलिसांनी अटक केली होती. तलवारीने केक कटिंग करतानाचा व्हिडीओ तरुणाने स्टेटसवर ठेवला होता.

औरंगाबाद शहरातील जुना मोंढा परिसरात हा प्रकार घडला होता. तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या बर्थडे बॉयला पोलिसांनी अटक केली होती. बावीस इंची तलवार घेऊन हर्षद रोहिदास गोरमे या आरोपीने जुना मोंढा परिसरामध्ये वाढदिवसाचा केक कापला होता.

व्हिडीओ व्हायरल

हर्षदने याचा व्हिडिओ स्टेटसवर ठेवला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्याला अटक केली. या प्रकरणी शस्त्रबंदी कायद्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. तलवारीने केक कापून त्याचे स्टेटस ठेवल्यामुळे परिसरात खळबळ पसरली होती.

संबंधित बातम्या :

VIDEO | तलवारीने केक कापून वाढदिवसाचे सेलिब्रेशन, औरंगाबादेत बर्थडे बॉयला अटक

बोनेटवर बसून तलवारीने केक कापला, साताऱ्यात गुंडाचा धिंगाणा, रस्त्यात गाणी लावून बर्थडे सेलिब्रेशन

सार्वजनिक ठिकाणी पौराणिक तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा, पुण्यात तरुणाला अटक

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.