Raigad Accident | मुरुडमध्ये रिक्षा उलटून अपघात, डोंबिवलीकर दाम्पत्याचा करुण अंत
रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील भोईघर फाट्यापासून काही अंतरावर हा अपघात झाला. बामणकोंडी वळणावर रिक्षा पलटी झाल्यामुळे त्यातून प्रवास करणाऱ्या पती-पत्नी या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
रायगड : रायगडमध्ये रिक्षा उलटून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पती पत्नीचा दुर्दैवी अंत झाला, तर रिक्षा चालक अपघातातून बचावला. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास रिक्षा पलटी झाल्यामुळे हा अपघात झाला होता.
नेमकं काय घडलं?
रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील भोईघर फाट्यापासून काही अंतरावर हा अपघात झाला. बामणकोंडी वळणावर रिक्षा पलटी झाल्यामुळे त्यातून प्रवास करणाऱ्या पती-पत्नी या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
डोंबिवली सोनारपाडा येथे राहणारे जगदीश मोतीराम वणे (वय 35 वर्ष) आणि ज्योत्स्ना जगदीश वणे (वय 28 वर्ष) हे दोघे मुरुड तालुक्यातील काजूवाडी येथे रिक्षाने आले होते.
वळणावर रिक्षा उलटून अपघात
दोघेही शुक्रवारी (7 जानेवारी) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास काजूवाडी ते भोईघर मार्गे बोर्लीकडे येत होते. रिक्षा बामणकोंडी वळणावर पलटी झाली. त्यांना लागलीच बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी ते दोघेही मयत झाल्याचे सांगितले.
सुदैवाने रिक्षा चालक अभिषेक चंद्रकांत राजापरकर हा या अपघातातून बचावला. या अपघाताचा अधिक तपास रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार गणेश म्हात्रे हे करत आहेत.
संबंधित बातम्या :
पैसे देण्यासाठी फेक पेटीएम अॅपचा वापर, 50 हजार दिल्याचा बनाव करुन काढला पळ, तिघांना बेड्या
मोबाईलवर गेम खेळणे जीवावर बेतले; रागाच्या भरात बापाने केली चिमुकल्याचा हत्या
61 वर्षीय नराधमाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडितेची प्रसुती, कोल्हापुरात खळबळ