दोन वर्षांनी गूढ उकललं, बाईक प्रवासात मालकाची कर्मचाऱ्याकडूनच हत्या, मृतदेह दरीत टाकला
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका येथे 28 जानेवारी 2020 रोजी राहत्या घरातून अमित उमाशंकर सिंग बेपत्ता झाला होता. तो मिसिंग असल्याची नोंद रोहा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र अमितचा खून झाला असल्याचं आता रोहा पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे.
रायगड : दोन वर्षांपूर्वी राहत्या घरातून बेपत्ता झालेल्या रायगडमधील तरुणाची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. अमित सिंगकडे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच त्याचा खून केल्याचं उघडकीस आलं आहे. बाईकवरुन प्रवास करताना अमित लघुशंकेसाठी उतरल्याची संधी साधून आरोपीने डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने त्याचा मृतदेह खोल दरीत टाकून दिला होता.
काय आहे प्रकरण?
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुका येथे 28 जानेवारी 2020 रोजी राहत्या घरातून अमित उमाशंकर सिंग बेपत्ता झाला होता. तो मिसिंग असल्याची नोंद रोहा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र अमितचा खून झाला असल्याचं आता रोहा पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे.
पोलीस अधिक तपास करत असताना 6 जानेवारी 2022 रोजी, दोन वर्षांनंतर विकास चव्हाण रोह्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता विकास चव्हाणने अमितचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
बाईक प्रवासात डोक्यात दगड घातला
अमित सिंग याच्याकडे नोकरी करणारा आरोपी विकास महादेव चव्हाण याने अमितच्या मोटारसायकलवरून रोहा-नागोठणे-भिसे खिंड असा प्रवास केला. अमित सिंग लघुशंका करण्यासाठी थांबला असता, विकासने दगडाने त्याच्या डोक्यात दोन वेळा प्रहार करुन त्याला जीवे ठार मारले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खोल दरीत टाकून दिला, अशी गुन्ह्याची कबुली विकास चव्हाण याने पोलिसांना दिली आहे.
आरोपी विकास चव्हाण याला पोलिसांनी अटक केली असून त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. पुढील तपास उपविभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय पाटील करत आहेत.
संबंधित बातम्या :
नकली दातांनी प्रायवेट पार्टसह शरीराचे चावे घ्यायचा, बायकोची पोलीस ठाण्यात धाव
बिहारमध्ये दृश्यमची पुनरावृत्ती, पत्नीच्या प्रियकराला अडकवण्यासाठी प्लॅन करुन मुलीची हत्या
इंदापूर तालुक्यातील ‘त्या’ हत्येचा अखेर उलगडा, पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या; भावानेच केली हत्या