Sangli Murder | बारावीची परीक्षा द्यायला जेलबाहेर आला आणि रोहन नाईकचा खून केला!
सांगली जिल्हा रुग्णालय आणि एसटी स्टँड रोडवर अज्ञात हल्लेखोरांकडून रोहन नाईक या तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. धारदार शस्त्रासह हल्लेखोरांनी रोहनवर दगडानेही हल्ला केला होता.
सांगली : सांगलीतील रोहन नाईक हत्या प्रकरणात (Rohan Naik Murder Case) धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारावीची परीक्षा देण्याच्या बहाण्याने आरोपी जामिनावर बाहेर आला होता, यावेळी त्याने खून केल्याचं उघडकीस आलं आहे. खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीबद्दलची माहिती उघड झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी सांगली स्टॅंडकडे (Sangli Crime) जाणाऱ्या रोडवर रोहन नाईकचा खून झाला होता. या हत्या प्रकरणी दोघे जण अटकेत असून मुख्य संशयिताचा अद्याप शोध सुरु आहे. संबंधित आरोपी कारागृहात होता, मात्र बारावीची परीक्षा देण्याच्या निमित्ताने जामिनावर जेलबाहेर आला होता.
नेमकं काय घडलं?
सांगली जिल्हा रुग्णालय आणि एसटी स्टँड रोडवर अज्ञात हल्लेखोरांकडून रोहन नाईक या तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. धारदार शस्त्रासह हल्लेखोरांनी रोहनवर दगडानेही हल्ला केला होता. या हल्यात रोहनचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सांगली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर मृतदेह शासकीय जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तसंच हत्येच्या घटनेमुळे सांगलीत दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
बारावीच्या परीक्षेसाठी जामीन
हत्या प्रकरणी दोघे जण अटकेत असून मुख्य संशयिताचा अद्याप शोध सुरु आहे. संबंधित आरोपी कारागृहात होता, मात्र बारावीची परीक्षा देण्याच्या निमित्ताने जामिनावर जेलबाहेर आला होता.
संबंधित बातम्या :
सांगलीत हत्यासत्र सुरुच! अज्ञातांकडून तरुणावर धारदार शस्त्राने वार; पोलिसांसमोर आव्हान
नातेवाईकांची बदनामी, बार मालकाचा माजी नगरसेवकावर खुनी हल्ला, दोघे गंभीर