चोरीच्या उद्देशाने सोलापूरहून सांगलीत, शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून 50 हजार ‘उडवणारा’ सापडला
भर सभेत गर्दीमध्ये व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून नोटांचं बंडल लांबवण्याची हिंमत करणारा चोरटा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने याआधी अशा प्रकारच्या अनेक चोऱ्या केल्या आहेत.
सांगली : शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून 50 हजार रुपयांच्या नोटांचं बंडल (Note bundle) चोरणारा भामटा अखेर सापडला आहे. सांगलीत ओबीसी मेळाव्यादरम्यान भर व्यासपीठावर ही धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं होतं. या चोरट्याला सांगली शहर आणि मिरज पोलिसांनी जेरबंद केलं आहे. ओबीसी समाजाचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीमध्ये काही दिवसांपूर्वी ओबीसी मेळावा पार पडला होता. यावेळी वडेट्टीवार स्टेजवर उपस्थित असतानाच चोरट्याने हात साफ केला होता. चोरट्याने शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्या खिशातील नोटांचे बंडल लांबवले होते. ही घटना (Sangli Theft) कॅमेरामध्ये कैद झाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करुन चोराचा शोध सुरु करण्यात आला होता.
कोण आहे चोरटा?
भर सभेत गर्दीमध्ये व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून नोटांचं बंडल लांबवण्याची हिंमत करणारा चोरटा अट्टल गुन्हेगार आहे. त्याने याआधी अशा प्रकारच्या अनेक चोऱ्या केल्या आहेत. त्याच्यावर गुन्हेही दाखल आहेत. त्याचे वय फक्त 21 वर्ष आहे. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील आहे. चोरीच्या उद्देशानेच तो सांगलीमध्ये ओबीसी मेळाव्याला आला होता.
नेमकं काय घडलं होतं?
सांगली शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्या खिशातील 50 हजार रुपयांच्या नोटांचं बंडल चोरट्याने चोरलं. सांगलीच्या स्टेशन चौकात काँग्रेस नेते, मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ओबीसी मेळाव्या दरम्यान ही घटना घडल्याचं समोर आलं होतं.
स्टेजवर जाऊन चोरट्याने शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून नोटांचं बंडल लांबवण्याची हिंमत केली. व्यासपीठावर असलेल्या गर्दीचा फायदा घेत त्याने नोटा लांबवल्या होत्या. शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
भाड्याने घर बघण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या वृद्ध महिलेला पोलिसांनी घातल्या बेड्या
सांगलीत चित्तथरारक पाठलाग करत पोलिसांनी पकडला चोरीला गेलेला ट्रॅक्टर
CCTV | आधी लांबून अंदाज घेतला, नंतर Activa उचलली, वसईतील धाडसी चोरी सीसीटीव्हीत कैद