नाकाबंदीत उडवाउडवीची उत्तरं, दरोडा टाकण्याच्या तयारीत नऊ जणांच्या टोळीला अटक
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात बार्शी -भूम राज्य मार्गावर काटेगावजवळील एका हॉटेलच्या समोर नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.
सोलापूर : दरोडा टाकण्यासाठी निघालेल्या नऊ जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका पोलिसांनी टोळीतील सदस्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तलवार, लाल रंगाचा स्क्रू ड्रायव्हर, दरोडा टाकण्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात बार्शी -भूम राज्य मार्गावर काटेगावजवळील एका हॉटेलच्या समोर नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तलवार, लाल रंगाचा स्क्रू ड्रायव्हर, दरोडा टाकण्यासाठी लागणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
रात्री उशिरा प्रवास करण्याचे कारण पोलिसांनी विचारल्यानंतर सर्वांनी विसंगत उत्तरं दिली. आरोपींनी दिलेली उडवाउडवीची उत्तरं ऐकून पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. यावेळी दारु सोडून पळून जाण्याच्या तयारीत असताना नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपी उस्मानाबादचे रहिवासी
पोलिसांच्या ताब्यात असलेले नऊ जण उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा गावचे रहिवासी आहेत. पुढील तपास बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यातील ग्रामीण भागाला हादरवून सोडणाऱ्या तोंडोळी दरोड्यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. पैठण तालुक्यातील बिडकीजवळील तोंडोळी येथील शेतवस्तीवर राहणाऱ्या मध्य प्रदेशातील कुटुंबावर दरोडेखोरांनी 19 ऑक्टोबर रोजी हल्ला करून बेदम मारहाण केली होती. एवढ्यावरच न थांबता दरोडेखोरांनी कुटुंबातील पुरुषांना बाजूच्या खोलीत हातपाय बांधून कोंडले, तर बाहेर एकाच्या गळ्याला चाकू लावून चार पैकी दोन महिलांवर चौघा जणांनी सामूहिक अत्याचार केला होता.
संबंधित बातम्या :
जालन्यात बुलडाणा अर्बन बँकेवर सशस्त्र दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत भर दिवसा बँक लुटली