Holi | रंग लावू नये म्हणून गच्चीत पळाला, इमारतीतून पडून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू

इमारतीच्या टेरेसवर असलेल्या डक्टमधून सूरज खाली पडला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली. यानंतर त्याच्या भावाने आणि मित्रांनी तातडीने आधी अंबरनाथच्या एका खासगी रुग्णालयात नेले

Holi | रंग लावू नये म्हणून गच्चीत पळाला, इमारतीतून पडून 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू
अंबरनाथमध्ये तरुणाचा गच्चीतून पडून मृत्यूImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 7:42 AM

अंबरनाथ : धुळवडीला (Holi 2022) मित्रांनी रंग लावू नये, म्हणून इमारतीच्या गच्चीत जाऊन लपलेल्या तरुणाचा घात झाला. गच्चीतून पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरामध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. 26 वर्षीय सुरज मोरे या तरुणाला प्राण गमवावे लागले. शिवाजीनगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे ऐन सणाच्या दिवशी मोरे कुटुंबियांवर मात्र मोठा आघात झाला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अंबरनाथच्या शिवाजीनगर भागातील मधल्या आळीत सुरज मोरे हा 26 वर्षीय तरुण वास्तव्याला होता. धुळवडीच्या दिवशी सुरज हा त्याचा भाऊ तुषार मोरे याच्यासह दुपारी 1 वाजताच्या सुमारास अविनाश पाटील या मित्राला भेटण्यासाठी गेले होते.

नेमकं काय घडलं?

शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर नव्याने झालेल्या इमारतीत अविनाश वास्तव्याला असून याच इमारतीखाली हे तिघे बोलत उभे होते. यावेळी त्यांच्याच परिसरातले इतर काही मित्र तिथून जात असताना त्यांना सूरज आणि तुषार दिसल्याने ते त्यांना रंग लावण्यासाठी आले.

यावेळी सूरज आणि तुषार हे दोघेही इमारतीत पळाले. तुषार हा पहिल्या मजल्यावर लपला, तर सूरज हा थेट गच्चीत जाऊन लपला. यावेळी तुषार याला मित्रांनी पकडून खाली आणलं, मात्र त्याला रंग लावत असतानाच अचानक सूरज हा गच्चीतून खाली पडला.

डक्टमधून खाली पडला

इमारतीच्या टेरेसवर असलेल्या डक्टमधून सूरज खाली पडला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली. यानंतर त्याच्या भावाने आणि मित्रांनी तातडीने आधी अंबरनाथच्या एका खासगी रुग्णालयात, तिथून उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणि तिथून उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात सूरजला नेलं. मात्र दुपारी साडेतीनच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

या घटनेमुळे ऐन सणाच्या दिवशी मोरे कुटुंबियांवर मात्र मोठा आघात झाला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया देशमुख करत आहेत.

संबंधित बातम्या :

होळीनिमित्त जावयाची गाढवावर बसवून मिरवणूक काढण्याची परंपरा

मुंबईत मस्करीची कुस्करी, होळीला रंगांचा फुगा मारला, बाईकचा धक्का लागून सायकलस्वाराचा मृत्यू

नशीब वेळीच गाडीबाहेर पडले, नाहीतर…? Holi साठी यवतमाळहून वर्ध्याला जाताना भररस्त्यात अग्नितांडव

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.