महाराष्ट्र हादरला! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हा दाखल

अत्याचार करणाऱ्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्र हादरला! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Dec 12, 2020 | 8:23 AM

कोल्हापूर : महिला अत्याचाराची एक धक्कादायक घटना कोल्हापुरातून समोर आली आहे. एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील साखरवाडी इथली ही घटना आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. या प्रकरणात पोलीस तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Maharashtra kolapur news Gang rape of a married woman case against two including a minor child)

मिळालेल्या माहितीनुसार, अत्याचार करणाऱ्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. ही विवाहित महिला दीड वर्षांच्या मुलीला घेऊन शेजारील घरात गप्पा मारण्यासाठी गेली असता तिच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला. घरात कोणीही महिला नसल्याचं लक्षात आलं. पण तोच घरातील संशयित आरोपींनी तिचे हात खाटेला बांधून तिच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.

याप्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात एका अल्पवयीनसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर विवाहितेवर बलात्कार करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलगाही असल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

या घटनेचा कोडोली पोलीस तपास करत असून पीडित महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याचं सांगण्यात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या वैद्यकीय चाचण्याही करणं आवश्यक आहे. दरम्यान, त्यांची दीड वर्षांची मुलगी सुखरूप आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत असून घरातील इतरांची चौकशी करत असल्याचं माहिती देण्यात आली आहे. (Maharashtra kolapur news Gang rape of a married woman case against two including a minor child)

इतर बातम्या –

नागपूरमधील रेडलाईट एरियात पोलिसांची मोठी कारवाई, 8 अल्पवयीन मुलींची सुटका, 100 ग्राहक ताब्यात

कोरोना पॉझिटिव्ह महिलेचे बेशुद्धावस्थेत अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढल्यानं खळबळ

(Maharashtra kolapur news Gang rape of a married woman case against two including a minor child)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.