मुंबई पुणे महामार्गावर डेकोरेशनच्या गाडीला भीषण अपघात, 22 जण टपावरुन कोसळले

सहारा सिटी येथून मंडप काम करुन मुंबईकडे परतणाऱ्या डेकोरेशन साहित्याच्या गाडीला अपघात झाला. यामध्ये गाडीतील टपावर बसलेले 22 जण खाली कोसळले. त्यातील एकाला प्राण गमवावे लागले आहेत.

मुंबई पुणे महामार्गावर डेकोरेशनच्या गाडीला भीषण अपघात, 22 जण टपावरुन कोसळले
मुंबई पुणे महामार्गावर अपघातImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 8:37 AM

रायगड : डेकोरेशन साहित्याची वाहतूक करणाऱ्या गाडीला भीषण अपघात (Accident) झाला. मुंबई पुणे महामार्गावर (Mumbai Pune Highway) पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. यावेळी गाडीच्या टपावरुन प्रवास करणारे तब्बल 22 जण भर रस्त्यात कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी आहे. अन्य चार ते पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मुंबई पुणे महामार्गावरील अंडा पॉईंट (Anda Point) जवळ हा अपघात झाला.

नेमकं काय घडलं?

पहाटे तीन वाजताच्या सुमारास मुंबई पुणे महामार्गावरील मॅजिक पॉईंट जवळ (अंडा पॉईंट) बोरघाट येथे अपघात झाला. सहारा सिटी येथून मंडप काम करुन मुंबईकडे परतणाऱ्या डेकोरेशन साहित्याच्या गाडीला अपघात झाला. यामध्ये गाडीतील टपावर बसलेले 22 जण खाली कोसळले. त्यातील एकाला प्राण गमवावे लागले आहेत. तर चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, लोकमान्य आरोग्य यंत्रणा, खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी यावेळी मदतकार्य करत जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

संबंधित बातम्या :

 टायर फुटल्यानं अपघात, संरक्षक भिंतीवर जाऊन आदळली कार

CCTV | बाईकला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात, पाच सेकंदात गाडी सात वेळा पलटी

CCTV | कारचालकाची अक्षम्य हलगर्जी, खेळणारा दोन वर्षांचा चिमुरडा गाडीखाली आला, आणि…

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.