राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचीच तक्रार

मिरजेतील राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या सांगली जिल्हाध्यक्षा संध्या आवळे यांनी पतीच्या आजारपणामुळे आणि लॉकडाऊनमध्ये पैशाची गरज असल्याने नगरसेविका संगीता हारगे यांच्याकडून 2021 मध्ये 55 हजार रुपये उसनवार घेतले होते

राष्ट्रवादीच्या नगरसेविकेवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचीच तक्रार
आरोपी नगरसेविका संगीता अभिजित हारगे Image Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 08, 2022 | 9:54 AM

सांगली : मिरजमधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका संगीता अभिजित हारगे (Sangeeta Harge) यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या सांगली जिल्हाध्यक्षा संध्या आवळे (Sandhya Awale) यांच्या तक्रारीनुसार राष्ट्रवादीच्याच नगरसेविकेवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून संध्या आवळे यांना शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच संध्या आवळेंना जातिवाचक शिवीगाळ करुन अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचाही दावा केलाी जात आहे. याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका संगीता हारगे या सांगली महापालिकेच्या माजी स्थायी सभापती असून, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अभिजित हारगे यांच्या पत्नी आहेत.

काय आहे प्रकरण?

मिरजेतील राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या सांगली जिल्हाध्यक्षा संध्या आवळे यांनी पतीच्या आजारपणामुळे आणि लॉकडाऊनमध्ये पैशाची गरज असल्याने नगरसेविका संगीता हारगे यांच्याकडून 2021 मध्ये 55 हजार रुपये उसनवार घेतले होते. त्या बदल्यात नगरसेविका संगीता हारगे यांनी त्यावर पाच टक्के व्याजाची आकारणी केली, त्यापैकी 39 हजार रुपये रक्कम परत केली असता थोड्या प्रमाणात मुद्दलही जमा केली असल्याचे संध्या आवळे यांनी तक्रारीत सांगितले आहे.

याबाबत नगरसेविका संगीता हारगे यांनी वारंवार अजून 52 रुपये द्यायला लागतील असे सांगून धमकावले, तसेच शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास देणे सुरु केल्याची तक्रार संध्या आवळे यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात केली आहे. त्याशिवाय थकित रक्कम फेडण्यासाठी जातीवाचक भाषा वापरून अवमानित करत असल्याचेही तक्रारीत सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

 82 वर्षांचे शरद पवार कुस्तीच्या आखाड्यात म्हणतात, ‘अजून मी म्हातारा नाही’!

येणारे येतीलचं, पण तुमच्या नशिबी पंतप्रधान पदाची खुर्ची नाही, सदाभाऊ खोत यांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

ठाकरे सरकारचे बडे मंत्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीला, कोणत्या मुद्यावर चर्चा?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.