Solapur Accident | ऊस नेणारा ट्रॅक्टर मागे घसरला, ट्रकच्या केबिनमध्ये घुसून चक्काचूर, सोलापुरात भीषण अपघात
सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात ऊस घेऊन चाललेला ट्रॅक्टर स्लिप होऊन मागे सरकल्याने मागे थांबलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये घुसला. त्यामुळे केबिनचा चेंदामेंदा झाला. सुदैवाने ट्रक चालकाचा थोडक्यात जीव वाचला. चालकावर उपचार सुरु आहेत.
सोलापूर : ऊस घेऊन चाललेला ट्रॅक्टर घसरुन भीषण अपघात (Solapur Accident) झाला. सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील रोकडोबा मंदिरासमोर हा अपघात झाला. यावली सालसे राज्य मार्गाचे काम माढ्यात अर्धवट राहिले असल्याने अपघात वाढत असल्याचं बोललं जात आहे. ट्रॅक्टर स्लिप (Tractor) होऊन मागे सरकल्यामुळे मागे थांबलेल्या ट्रकवर आदळला. ट्रकच्या केबिनमध्ये ट्रॅक्टर ट्रेलर घुसल्याने केबिन अक्षरशः चक्काचूर झाली. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नेमकं काय घडलं?
सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात ऊस घेऊन चाललेला ट्रॅक्टर स्लिप होऊन मागे सरकल्याने मागे थांबलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये घुसला. त्यामुळे केबिनचा चेंदामेंदा झाला. सुदैवाने ट्रक चालकाचा थोडक्यात जीव वाचला. चालकावर उपचार सुरु आहेत.
माढ्यातील रोकडोबा मंदिरा समोर बुधवारी (दि.13 एप्रिल) सकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे अनेक तास वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
शेतकरी सचिन वाघ याने पुढाकार घेऊन स्वतःच्या ट्रॅक्टरने वाहने बाजुला काढली, त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या ठिकाणी गेल्या आठ दिवसात घडलेला चौथा अपघात आहे. यावली सालसे राज्य मार्गाचे काम अर्धवट रखडले असून हे सुरु करावे अन्यथा मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
संबंधित बातम्या :
भरधाव डंपारने बाप-लेकाला संपवले; सांगलीतील आष्टा मार्गावर भीषण अपघात
आईवडिलांकडे बाळंतपणासाठी जात होती, खड्ड्यांनी घेतला बाळ-बाळंतिणीचा जीव
पंढरपूरला निघालेली भक्तांची गाडी उलटली, तळेगावचे 19 भाविक जखमी