BaBa Siddiqui : बाबा सिद्दीकींना गोळ्या का घातल्या? मुख्य शूटर शिवकुमारचा खळबळजनक गौप्यस्फोट

BaBa Siddiqui : बाबा सिद्दीकींना गोळ्या का घातल्या? या संदर्भात मुख्य शूटर शिवकुमार गौतमने खुलासा केला आहे. त्याला बिश्नोई गँगने काय सांगितलं होतं? त्याचा संपर्क कसा झाला? त्याला किती लाख रुपये मिळणार होते? अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.

BaBa Siddiqui : बाबा सिद्दीकींना गोळ्या का घातल्या? मुख्य शूटर शिवकुमारचा खळबळजनक गौप्यस्फोट
BaBa Siddiqui murder case
Follow us
| Updated on: Jan 30, 2025 | 3:25 PM

माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 4500 पानी आरोपपत्र दाखल केलय. त्यातून अनेक खळबळजनक गोष्टी समोर आल्या आहे. या आरोपपत्रात बाबा सिद्दीकी यांना गोळ्या घालणारा मुख्य शूटर शिवकुमार गौतम याची सुद्धा जबानी आहे. दाऊद इब्राहिमशी असलेले संबंध आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात त्यांचा सहभाग असल्याने अनमोल सिद्दीकीने ठार मारण्याचे आदेश दिले होते, असा दावा शिवकुमार गौतमने केला आहे.

मी पुण्यात भंगार गोळा करायचो आणि सहआरोपी हरीशकुमार कश्यपला विकायचो, असं शिकुमार गौतमने सांगितलं. कश्यपचे रद्दीचे दुकान होते. त्यांनी राहण्याची व्यवस्था केली होती. यादरम्यान त्यांची प्रवीण लोणकर आणि शुभम लोणकर यांच्याशी ओळख झाली. “एके दिवशी शुभमने सांगितले की ते दोघे भाऊ लॉरेन्स गँगसाठी काम करतात. जून 2024 मध्ये शुभमने मला आणि धर्मराज कश्यपला सांगितले की, जर आम्ही त्याच्या सूचनेनुसार काम केले तर आम्हाला 15 लाख रुपये मिळू शकतात” असं शिवकुमार गौतमने सांगितलं.

स्नॅप चॅटद्वारे व्हिडिओ कॉल

“जेव्हा मी कामाबद्दल विचारले तेव्हा शुभमने सांगितले की आम्हाला बाबा सिद्दीकी किंवा त्याचा मुलगा झिशान सिद्दीकी नावाच्या व्यक्तीला मारायचे आहे. एके दिवशी शुभमने अनमोल बिश्नोईला त्याच्या फोनवर स्नॅप चॅटद्वारे व्हिडिओ कॉल केला. आम्हाला ज्या व्यक्तीला मारायचे होते तो दाऊद इब्राहिमशी संबंधित होता आणि मुंबई बॉम्बस्फोटात त्याचा हात असल्याचे बिश्नोईने सांगितले” असं शिवकुमार गौतम म्हणाला.

आम्हाला खात्री पटली

“पैशांची गरज असेल, तर शुभम त्याची व्यवस्था करेल, असे सांगितले. दोन्ही लोणकर बंधूंनी त्यांच्यासाठी काम केले याची आम्हाला खात्री पटली. शुभमच्या विनंतीवरून मी माझ्या मोबाईलवर स्नॅपचॅट डाउनलोड केले आणि थेट अनमोल बिश्नोईशी बोलू लागलो” असं शिवकुमार गौतम म्हणाला.

वाँटेड आरोपी दाखवण्यात आले

शिकुमार गौतम व्यतिरिक्त, आणखी सहा जणांचा कबुलीजबाब 26 आरोपींविरुद्ध विशेष मकोका न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या 4500 पानांच्या आरोपपत्राचा भाग आहे. शुभम लोणकर, यासीन अख्तर आणि अनमोल बिश्नोई यांना वाँटेड आरोपी दाखवण्यात आले आहे. शूटर गुरमेल सिंगच्या वक्तव्यानुसार, सिद्दिकीच्या हत्येसाठी त्याला ऑगस्ट 2024 मध्ये देशाबाहेर जाण्यासाठी 50,000 रुपयांची ऑफर देण्यात आली होती.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....