देवदर्शन करुन परतणाऱ्यांवर काळाचा घाला! अक्कलकोट-गाणगापूर रोडवर भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

अक्कलकोट गाणगापूर रोडवर कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 04 महिला आणि 01 चालक असे एकूण 05 जण जागीच ठार झालेत.

देवदर्शन करुन परतणाऱ्यांवर काळाचा घाला! अक्कलकोट-गाणगापूर रोडवर भीषण अपघात, 5 जण जागीच ठार
अपघातानंतर गाडीतच अडकून पडले होते मृतदेहImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 8:42 PM

सोलापूर : अक्कलकोट-गाणगापूर रोडवर (Akkalkot-Gangapur Road) कारचा भीषण अपघात (Major Road Accident) झाला आहे. या अपघातामध्ये 04 महिला आणि 01 चालक असे एकूण 05 जण जागीच ठार झालेत. अहमदनगरहून गाणगापूरला दर्शनासाठी गेले होते. गाणगापूरहून परत अहमदनगरला परतत असताना चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात गाडी झाडावर आदळली आणि पाच जण जागीच ठार झालेत. अपघातातील पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्नाटकातील (Karnataka) अफझलपूर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. कर्नाटकातील अफझलपूर पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. अक्कलकोट गाणगापूर रोडवर बळोरगी जवळ हा अपघात झाला.

कारचा चक्कचूर!

MH 16 BH 5392 असा गाडीचा नंबर आहे. शिकाऊ चिन्ह असलेलं ‘L’ असं देखील गाडीच्या मागच्या काचेवर दिसून आलं आहे. डॅटसन गो प्लस या गाठीतून हे सर्वजण प्रवास करत होते. दरम्यान, गाडीनं समोरच्या बाजूनंच झाडाला धडक दिली आणि यात कारचा चक्काचूर झालाय. तर गाडीतील पाच जणांना जबर मार लागून त्यांचाही जागीच मृत्यू झाला आहे.

मृतामध्ये चार महिलांचा समावेश

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनीच घटनास्थळी धाव घेतली. यानंतर स्थानिकांनी गाडीतील मृतदेह बाहेर काढलेत. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. तर एक पुरुष चालकाचाही मृत्यू झाला आहे.

रक्तबंबाळ अवस्थेत गाडीतच प्रवाशांचे मृतदेह अडकून पडले होते. तर गाडी रस्ता साडून एका बाजूला कलंडली होती. गाडीच्या मागच्या आणि पुढच्या दोन्ही काचा फुटल्या होत्या. दरम्यान, आता पोलिस या अपघाताबाबत अधिक तपास करत आहेत. सध्या अपघातातील सर्व मृतदेह हे शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

पाहा अपघातानंतरचे अंगावर काटा आणणारा फोटो :

संबंधित बातम्या :

PHOTO | बुलडाण्यात सवर्णा फाट्यावर विचित्र अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली

अकोल्यात दोघांचे अपहरण करणाऱ्या 3 खंडणी बहाद्दरांना पोलिसांनी केली अटक

जुन्या वादातून तीन सख्ख्या भावांवर हल्ला, दोघांचा मृत्यू, बारा वर्षांनी आरोपीला शिक्षा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.