अक्सा बीचवर सापडलेल्या विवाहितेच्या मृतदेहाचं गूढ उकललं, सासरा गजाआड

मुंबई : मुंबईतील मालाड भागात अक्सा बीचवर सापडलेल्या विवाहितेच्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. महिलेच्या सासऱ्यासह तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. मुलाचा प्रेमविवाह मान्य नसल्यामुळेच सासऱ्याने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. (Malad Aksa Beach Lady Murder mystery solved) अक्सा बीचवर पाच दिवसांपूर्वी प्लास्टिकच्या गोणीत महिलेचा मृतदेह सापडला […]

अक्सा बीचवर सापडलेल्या विवाहितेच्या मृतदेहाचं गूढ उकललं, सासरा गजाआड
Follow us
| Updated on: Dec 30, 2020 | 12:43 PM

मुंबई : मुंबईतील मालाड भागात अक्सा बीचवर सापडलेल्या विवाहितेच्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. महिलेच्या सासऱ्यासह तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. मुलाचा प्रेमविवाह मान्य नसल्यामुळेच सासऱ्याने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. (Malad Aksa Beach Lady Murder mystery solved)

अक्सा बीचवर पाच दिवसांपूर्वी प्लास्टिकच्या गोणीत महिलेचा मृतदेह सापडला होता. मयत तरुणीचे नाव नंदनी रॉय होतं. नंदनीचा प्रेमविवाह झाला होता. मात्र तिच्या सासऱ्यांना ती पसंत नव्हती. त्यामुळे त्यांनी नंदनीची हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर नंदनीचा मृतदेह प्लास्टिकच्या गोणीत बांधून त्यांनी अक्सा बीचवर टाकला होता. हत्या प्रकरणी मालवणी पोलिसांनी सासऱ्यांसह तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

अक्सा बीचवर 24 डिसेंबरला प्लास्टिकच्या गोणीत विशीतील महिलेचा मृतदेह सापडला होता. आयएनएस हमलाजवळ समुद्राच्या पाण्यात गेल्या गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास हा मृतदेह आढळला होता. मृतदेहाची कुजलेली अवस्था पाहून तीन ते चार दिवसांपूर्वी तिची हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.

डाव्या हातावर टॅटू

पोलिसांनी महिलेचा मृतदेह रुग्णालयात नेला, तेव्हा तिच्या डाव्या हातावर टॅटू असल्याचं डॉक्टरांनी पोलिसांना सांगितलं. तिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि लाल मण्यांचा नेकलेस होता. टॅटू आणि दागिन्यांचा दुवा पोलिसांना महिलेचा शोध घेण्यात महत्त्वाचा ठरु शकतो, असा अंदाज होता.

महिलेचा चेहरा ओळखण्यापलिकडे गेला होता. तिचा मृतदेह अक्सा बीचवर टाकला, की समुद्राच्या पाण्यासोबत वाहत तो कुठून आला, याचा शोध घेण्याचं आव्हान होतं. अवघ्या आठवड्याभरातच मालवणी पोलिसांनी माग काढत महिलेच्या सासऱ्याला जेरबंद केलं.

संबंधित बातम्या : 

विवाहबाह्य संबंधाला मुलाचा अडथळा, प्रियकराच्या मदतीने आईनेच काटा काढला

आईच्या प्रियकराची निर्घृण हत्या, मुंबईतील धारावी हादरली

(Malad Aksa Beach Lady Murder mystery solved)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.