आरेनंतर मालाडमध्ये रिक्षात महिलेचा विनयभंग, पोलिसांनी 12 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या !

महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. दिवसाढवळ्या भररस्त्यातही महिलांवर अत्याचार होत आहेत. यावरुन गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे दिसते.

आरेनंतर मालाडमध्ये रिक्षात महिलेचा विनयभंग, पोलिसांनी 12 तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या !
रिक्षात महिलेचा विनयभंगImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 10:47 AM

मुंबई : गोरेगावमधील आरेमध्ये महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आता पुन्हा मालाड येथे अशीच घटना घडली आहे. एक महिला रिक्षातून कुठेतरी चालली होती. यावेळी मालाड पश्चिमेतील जैन मंदिरासमोर एका अज्ञात इसमाने रिक्षातच महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी महिलेने मालाड पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरुन मालाड पोलिसांनी गुन्हा नोंदवत 12 तासाच्या आत आरोपीला अटक केली. मालाड पोलिसांनी भादवी कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

पीडित महिला 7 जुलै रोजी मालाड पश्चिमेतील आनंद रोडवरुन रिक्षाने प्रवास करत होती. जैन मंदिरसमोर सकाळी 9.55 वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी इसमाने रिक्षात हात घालून महिलेचा विनयभंग केला. दिवसाढवळ्या गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. महिलेने मालाड पोलिसात धाव घेत याबाबत तक्रार नोंदवली. गुन्हा दाखल झाल्यानंतर 6 तासात पोलिसांनी कसून शोध घेत मालाड परिसरातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

वसईत भररस्त्यात महिलेला मारहाण

भररस्त्यात एका महिलेला मारहाण केल्याची घटना वसईत उघडकीस आली आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. महिलेच्या काखेत एक मूल आहे. एक पुरुष त्या महिलेला क्रूर पद्धतीने मारहाण करत आहे. रविवारी वसई पश्चिमेला स्टेशन रोडवर ही घटना घडली.

हे सुद्धा वाचा

काही वेळाने 2 ते 3 महिला पीडितेच्या मदतीला धावून आल्या. हा पुरुष कोण आहे? त्या महिलेला मारहाण का करत आहे? याबाबत माहिती मिळाली नाही. मात्र भरदिवसा सार्वजनिक ठिकाणी खुलेआम होणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांमुळे महिलांचा सुरक्षा ऐरणीवर आहे.

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.