आईस्क्रीम कपमधील मानवी बोटाचं गुढ असं उकललं; पोलिसांनी असा लावला छडा
मुंबईतील पश्चिम उपनगरातील मालाड येथे राहणाऱ्या 26 वर्षीय एमबीबीएस डॉक्टरला त्याच्या आईस्क्रीम कोनमध्ये नख असलेला अर्धा इंचाचा मानवी बोटाचा तुकडा सापडला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती.
मुंबई : जून महिन्याच्या पंधरावड्यात मुंबईतील एका विचित्र घटनेने सर्वांना धक्का बसला होता. मुंबईतील एका डॉक्टरने ऑनलाईन मागविलेल्या आईस्क्रीममध्ये चक्क मानवी बोटाचा तुकडा सापडल्याने खळबळ उडाली होती. या आईस्क्रीमच्या कपात मानवी बोट नेमकं आले कुठन या प्रश्नाने संबंधित ग्राहक, कंपनी आणि सर्वांनाच कोडे पडले होते. अखरे याचा शोध पोलिसांनी घेतला आहे. या प्रकरणात संबंधित कंपनीने देखील आपली इभ्रत राखण्यासाठी सहकार्य केले आणि अखेर पोलिसांनी त्या माणसाला शोधूनच काढलं ज्याचे हे बोट होते.
मालाड येथे राहणारे ओरलेम सेराव हे 26 वर्षीय एमबीबीएस डॉक्टर ऑनलाईन मागविलेले बटर स्कॉच आईस्क्रीम खात असताना त्यांना कोनमधील अनपेक्षित वस्तू पाहून धक्का बसला. एक मानवी बोटाचा तुकडा या आईस्क्रीमच्या कोनात होता. त्यांच्या बहीणीने हे ऑईस्क्रीम ऑनलाईन मागविले होते. त्यानंतर संबंधित डॉक्टरने कंपनीला इंस्टाग्राम वरुन तक्रार केली. परंतू कंपनीने दाद न दिल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. आतापर्यंत अन्नपदार्थ उंदीर, पाली, झुरळ असे किटक आणि प्राणी सापडले होते. परंतू एखाद्या अन्नपदार्थात मानवाचे तुटलेले बोट सापडण्याचा हा पहिलाच धक्कादायक प्रकार होता. या घटनेचा तपास पोलिसांनी सुरु केला.
बॅच नंबरने कारखाना उघड
कंपनीच्या कोनवरील बॅच नंबर आणि इतर माहीतीवरुन हे आईस्क्रीम कोणत्या कारखान्यात पॅकींग झाले होते हे कळाले. त्यानंतर संपूर्ण फॅक्टरीत चौकशी केली असता एक कर्मचारी रुग्णालयात भरती झाल्याचे कळाले. या बोटाला डीएएन टेस्टसाठी सांताकुझ-कालीना येथी फोरेन्सिक लॅबोरेटरीत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाला आल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तीचा डीएनए मॅच होतो का पाहीले. अखेर डीएएन मॅच झाल्यानंतर ते बोट याच कामगारांचे होते. त्याच्यासोबत 11 मे रोजी कंपनीत अपघात झाला तेव्हा त्याचे बोट उडून आईस्क्रीमध्ये पडल्याचे उघडकीस आले.
इंदापूरातील युनिट
पुण्याच्या इंदापूरातील फॉर्च्युन कंपनीतील असिस्टंट ऑपरेटर मॅनेजर असलेल्या ओमकार पोटे यांच्या हाताचे बोट कापले गेले होते. पोटे यांच्या उजव्या हाताचे मधले बोटाचा तुकडा तुटून उडाला होता. पोटे मुळचे सातारा येथील आहेत. मॅन्युफॅक्चरींग डेट आणि आईस्क्रीम कोनचा नंबरही जुळला. त्यामुळे हीच कंपनी दोषी आढल्याने युम्मो आईस्क्रीम कंपनीवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल झाला होता. 26 वर्षीय एमबीबीएस डॉक्टरला त्याच्या आईस्क्रीम कोनमध्ये नख असलेला अर्धा इंचाचा मानवी बोटाचा तुकडा सापडला होता. पुण्याच्या इंदापूर येथील हे आईस्क्रीम युनिटला अन्न सुरक्षा प्राधिकरणाने या कंपनी युनिट काम थांबविण्याची नोटीस दिली आहे.