दोन वर्षे काम करायचा, विश्वास जिंकायचा आणि चोरी करून गायब व्हायचा

काम करून मलकांचे मन जिंकणाऱ्या, आणि संधी मिळताच तो आपल्या बाकीच्या साथीदारांसह चोरी (Robbery) करणाऱ्या अशा चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही टोळी चोरी करायची आणि इतर राज्यात पळून जायची, अशा नेपाळी टोळीतील तीन चोरट्यांना (Thief gang) अटक केली आहे.

दोन वर्षे काम करायचा, विश्वास जिंकायचा आणि चोरी करून गायब व्हायचा
Follow us
| Updated on: Jan 15, 2022 | 9:53 PM

मुंबईच्या मालवणी पोलिसांनी नोकरीच्या बहाण्याने मुंबईसह देशाच्या इतर राज्यात जाऊन एक ते दोन वर्षे प्रामाणिकपणे काम करून मलकांचे मन जिंकणाऱ्या, आणि संधी मिळताच तो आपल्या बाकीच्या साथीदारांसह चोरी (Robbery) करणाऱ्या अशा चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही टोळी चोरी करायची आणि इतर राज्यात पळून जायची, अशा नेपाळी टोळीतील तीन चोरट्यांना (Thief gang) अटक केली आहे. एवढेच नाही तर किरकोळ चोरी झाली तर आणखी दोन तीन चोरी करायची आणि नंतर नेपाळला जायची. मोठी चोरी झाली तर तो थेट नेपाळला पळत असे. मालवणीचे पीएसआय हसन मुलाणी यांनी सांगितले की, मालाडच्या मढ भागात मच्छिमारांकडे गेल्या दोन वर्षांपासून काम करणाऱ्या सुमन जनक शाही नावाच्या नेपाळीने आपल्या तीन साथीदारांसह मढ येथील एका पेट्रोल पंपाच्या कार्यालयाचे कुलूप तोडले. मालवणी पोलिसांत तक्रार नोंदवून घेतल्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीने तपास केला असता याच बोटीवर काम करणाऱ्या एका नेपाळीने आपल्या साथीदारांसह चोरी केल्याचे आणि चोरी केल्यानंतर वेगवेगळ्या राज्यात पळून गेल्याचे निष्पन्न झाले.

विविध राज्यातून आरोपींना अटक

मालवणी पोलिसांनी तीनही नेपाळी आरोपींना देशातील विविध राज्यातून अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव प्रवीण बसंत शाही, त्याचे वय 33 वर्षे असून, पोलिसांनी त्याला बंगळुरू येथून अटक केली आहे. भारत रन बहादूर शाही असे दुसऱ्या आरोपीचे नाव असून तो २२ वर्षांचा असून, त्याला पोलिसांनी राजकोट येथून अटक केली आहे आणि तिसर्‍या आरोपीचे नाव सुमन जनक शाही आहे, वय 36 वर्षे आहे आणि त्याला मालाडच्या मढ़ परिसरातून अटक करण्यात आली आहे, हे सर्व आरोपी नेपाळमधील कालीकोट जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पेट्रोल पंप कार्यालयात चोरी करण्यापूर्वी आरोपींनी रेका केली, नंतर कुलूप तोडून 91 हजार 600 रुपये चोरून पळ काढला, सुदैवाने पेट्रोल पंपाचे उर्वरित पैसे आधीच बँकेत जमा होते.

पोलिसांनी आरोपींना अटक करून चौकशी केली असता या टोळीतील 11 जणांनी मिळून काही महिन्यांपूर्वी भिलवाडा येथे दोन ठिकाणी 26 लाखांची चोरी केल्याची कबुली दिली असल्याचे समोर आले. पोलिसांनी सांगितले की हे लोक कधीही फोन कॉलद्वारे चोरीची योजना आखत नाहीत, ही टोळी फेसबूक आणि मेसेंजर कॉलिंग करते, जेणेकरून पोलिसांना कॉल रेकॉर्ड मिळत नाहीत. आता हे चपळ चोर गजाआड झाले आहेत.

Beed Crime : बीडमधील ‘त्या’ जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृ्त्यू, नातेवाईकांची आरोपीच्या अटकेची मागणी

Yavatmal shooting case | उमरखेड येथील डॉक्टरांवरील गोळीबार प्रकरणी चार आरोपी जेरबंद; दहा पथकांनी कशी केली कारवाई?

Pune : धक्कादायक! पुण्यात वर्षभरात 123 गुन्ह्यात 147 विधिसंघर्षित बालकांचा सहभाग

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.