चिपळूणमध्ये थरार! नगरपरिषदेच्या इमारतीवरून थेट उडी घेतली, आणि…

चिपळूणमध्ये आज भयंकर थरार पाहायला मिळाला. थेट चिपळूण नगरपरिषदेच्या इमारतीवरून एका इसमाने त्याच्या दोन मुलासह उडी घेण्याचा प्रयत्न केला.

चिपळूणमध्ये थरार! नगरपरिषदेच्या इमारतीवरून थेट उडी घेतली, आणि...
man attempts suicide
Follow us
| Updated on: Dec 10, 2021 | 9:32 PM

लक्ष्मीकांत घोणसेपाटील, रत्नागिरी: चिपळूणमध्ये आज भयंकर थरार पाहायला मिळाला. थेट चिपळूण नगरपरिषदेच्या इमारतीवरून एका इसमाने त्याच्या दोन मुलासह उडी घेण्याचा प्रयत्न केला. पण नागरिकांची सतर्कता आणि दैव बलवत्तर म्हणून तो बचावला. पण, या व्यक्तीच्या आत्महत्या नाट्यामुळे नगरपरिषद परिसरात एकच खळबळ उडाील होती.

महेश नारायण नलावडे असं या व्यक्तीचं नाव आहे. तो खेड परिसरातील दळवटणे येथे राहतो. आज दुपारी तो दोन्ही मुलांना घेऊन बाजारपेठेत आला. संतापतच तो बाजारपेठेत आला होता. इकडे तिकडे पाहिल्यानंतर सर्वांची नजर चुकवत तो थेट चिपळूण नगरपरिषदेच्या इमारतीत घुसला. त्यानंतर त्याने दोन मुलांना घेऊन थेट गच्ची गाठली. पण मुलांचा रडण्याचा आवाज ऐकून काही नगरपरिषदेचे कर्मचारी गच्चीवर गेले. तेव्हा महेश हा त्याच्या दोन मुलांना इमारतीवरून फेकण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसलं. या कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन त्याच्याकडून दोन्ही मुलं हिसकावून घेतली. मुलांना हिसकावून घेत असताना महेशने जोर जोरात विरोध केला. त्यामुळे इमारती खालील लोकांना काही तरी गडबड असल्याचं दिसलं. लोकांची गर्दी झाली अन् काही लोकांनी तात्काळ ताडपत्री आणणून ती खाली धरली. एव्हाना घटनास्थळी पोलीसही दाखल झाले होते.

केबलचा अडथळा आला अन्

या कर्मचाऱ्यांनी दोन्ही मुलांना हिसकावून घेतल्यानंतर महेशने लगेचच स्वत: इमारतीवरून उडी मारली. पण त्याचं नशीब बलवत्तर होतं. सुदैवाने केबलचा अडथळा आला. त्यानंतर तो ताडपत्रीमध्ये जाऊन पडल्याने बचावला. ताडपत्रीत पडल्याबरोबर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला लागलं तर नाही ना याची खात्री करून घेतली. त्यानंतर त्याला तात्काळ पोलिसांच्या हवाली केलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस सुरू केली आहे.

पत्नीपासून विभक्त

महेश नलावडे याचं काही वर्षापूर्वी लग्न झालं होतं. त्याला दोन लहान मुले आहेत. पण काही महिन्यांपूर्वी त्याचं पत्नीशी भांडण झालं. वाद झाल्यामुळे त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नाही. दोघंही विभक्त राहतात. त्यामुळे टेन्शन आल्याने त्याने आज दोन मुलांसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या:

Navi Mumbai Crime | मुंबई, नवी मुंबईसह राज्याबाहेर करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या बंटी बबलीला अटक

भरदिवसा सोने खरेदीदाराला लुटणारे टोळी जेरबंद; पनवेल गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी

Pune Crime |पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ; पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या 6 जणांना अटक

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.