मिठ्ठूलाल तरुणीला वारंवार फोन करुन सतवायचा, सोनू अखेर सोनिया बनला, विकृताला अद्दल घडवण्यासाठी भावाची शक्कल

बहिणीला फोन करुन वारंवार त्रास देणाऱ्या तरुणाला अद्दल घडवण्यासाठी एका भावाने अनोखी शक्कल लढवली (man convert himself into girl for taking revenge).

मिठ्ठूलाल तरुणीला वारंवार फोन करुन सतवायचा, सोनू अखेर सोनिया बनला, विकृताला अद्दल घडवण्यासाठी भावाची शक्कल
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 2:56 PM

भोपाळ : एखादा तरुण जर आपल्या बहिणीला फोन करुन त्रास देत असेल तर आपण अर्थातच त्याच्यावर रागावणार. संबंधित युवकाला शिक्षा देणार किंवा त्याला ओरडणार, त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणार. पण मध्य प्रदेशच्या एका युवकाने त्या पलिकडे जाऊन संबंधित तरुणाला अद्दल घडवण्यासाठी विचित्र मार्ग अवलंबला. या मुलीच्या भावाने मुलीचे कपडे परिधान केले आणि त्याच्यासोबत फिरायला गेला. तो दिवसभर तरुणासोबत फिरला. त्याच्यासोबत मौजमस्ती केली आणि दारुही पिली. विशेष म्हणजे तरुणाला त्याच्याबद्दल जराही शंका आली नाही. पण या दोघांना रात्री उशिरा पोलिसांनी पकडलं. त्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला (man convert himself into girl for taking revenge).

नेमकं प्रकरण काय?

मध्य प्रदेशच्या नीमच जिल्ह्यातील नया या गावात संबंधित तरुणी राहते. तिला चित्तौडगड जिल्ह्यातील खेडी बेगू गावाचा रहिवासी असलेला मिठ्ठूीलाल नावाचा तरुण सारखा फोन करुन त्रास द्यायचा. त्याच्या फोनमुळे त्रस्त झालेल्या तरुणीने आपली व्यवस्था तिचा भाऊ सोनू याच्याकडे मांडली. सोनूला जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. पण त्याने तरुणाला अद्दल घडवण्यासाठी वेगळी शक्कल लढवली (man convert himself into girl for taking revenge).

तरुणाला अद्दल घडवण्यासाठी सोनूने नेमकं काय केलं?

सोनू हा गावातील अनेक सांस्कृति कार्यक्रमात किंवा नाटकात महिलेचं वेश परिधान करतो. त्यामुळे त्याने शक्कल लढवली. त्याने त्याच्या बहिणीच्या मोबाईल नंबरवरुन संबंधित तरुण म्हणजेच मिठ्ठूलाल याला फोन केला. त्याने मुलीच्या आवाजात त्याच्याशी बातचित करायला सुरुवात केली. यावेळी त्याने मिठ्ठूलाल याला गावाबाहेर भेटण्यासाठी बोलावलं.

मिठ्ठूलाल हा देखील भेटण्यासाठी उतावीळ होता. त्याने सोनू याच्याशी बोलताना लगेच होकार कळवलं. सोनूने फोनवर बोलताना स्वत:चं नाव सोनिया असं सांगितलं होतं. हा सोनू सोनिया बनून म्हणजेच मुलीचे कपडे परिधान करुन मिठ्ठूलाल याला भेटण्यासाठी गेला. त्यानंतर तो मिठ्ठूलाल याच्यासोबत बाईकवर फिरायला गेला. ते दोघं एकत्र फिरले. त्यांनी एकत्र मजामस्ती केली, दारु पिली. विशेष म्हणजे मिठ्ठूलाल याला सोनिया उर्फ सोनूवर अजिबात संशय आला नाही.

पोलिसांनी पकडल्यानंतर संबंधित प्रकार उघड

ते दिवसभर फिरल्यानंतर रात्री घराच्या दिशेला वळले. यावेळी चावण्डिया गावाजवळ काही स्थानिकांनी पोलिसांना फोन केला. या भागात बाईकवर चोर फिरत असल्याचा त्यांना संशय आला. पोलिसांनी वेळ न दडवता घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तिथे चोर नाही तर सोनू आणि मिठ्ठूलाल हे दोघं होते. विशेष म्हणजे पोलिसांनी अडवताच मिठ्ठूलाल हा तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला. पण सोनिया अर्थात सोनू पोलिसांच्या ताब्यात आला. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्याने सर्व प्रकार सांगितला.

हेही वाचा : नाशिकमधील वृद्ध शेतकरी हत्या प्रकरण, झारखंडमधून संशयिताच्या मुसक्या आवळल्या

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.