बोकडाऐवजी कापला माणसाचा गळा, दारुच्या नशेत क्रुर कृत्य; देवीच्या दरबारात हत्या
आंध्र प्रदेशमध्ये मकर संक्रांतीनिमित्त आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात (Regilious Rituals) अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथे देवीसमोर बोकड (Goat) कापण्याऐवजी एका माणसाने चक्क दुसऱ्या माणसाचा गळा कापला आहे. आंध्रप्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात हा प्रकार घडला असून मृत माणसाचे नाव सुरेश असून छलापती असे आरोपीचे नाव आहे.
आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशमध्ये मकर संक्रांतीनिमित्त आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात (Regilious Rituals) अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथे देवीसमोर बोकड (Goat) कापण्याऐवजी एका माणसाने चक्क दुसऱ्या माणसाचा गळा कापला आहे. आंध्रप्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात हा प्रकार घडला असून मृत माणसाचे नाव सुरेश असून छलापती असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने दारुच्या नशेत हे कृत्य केले आहे. छलापतीला पोलिसांनी (Police) अटक केलं असून त्याची चौकशी केली जात आहे. मात्र या विचित्र घटनेमुळे लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
नेमकं काय घडलं ?
मकर संक्रांतीनिमित्त चित्तूर जिल्ह्यातील वलसपल्ले या गावातील यलम्मा देवीच्या परिसरात हजारो लोक जमतात. येथे दरवर्षी देवीसमोर बोकडाचा बळी दिला जातो. देवासमोर अमानुषपणे प्राण्यांची कत्तल करणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, येथे यलम्मा देवीसमोर दरवर्षी बोकड कापला जातो. यावर्षीदेखील येथे संक्रांतीनिमित्त मोठ्या संख्येने लोक जमले होते. यावेळी मृत सुरेश यांनी बळी दिल्या जाणाऱ्या बोकडाला पकडलं होतं. तसेच आरोपी छलपती याच्या हातात सुरा होता. दारु पिलेला असल्यामुळे आपल्यासमोर कोण आहे हे त्याला समजले नाही. त्याने बोकडाचा गळा कापण्याऐवजी बोकडाला पकडलेल्या सुरेशचा गळा कापला.
सुरेशला रुग्णालयात केले दाखल, मात्र मृत्यू
या प्रकारानंतर येथे एकच खळबळ उडाली. सुरेश यांना तत्काळ मदनपल्ले येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रक्त जास्त प्रमाणात गेल्याने सुरेशचा यामध्ये मृत्यू झाला. सध्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत.
प्राण्यांचा छळ करणे गुन्हा
दरम्यान, प्रव्हेंशन ऑफ क्रुएलीटी अॅक्टनुसार 1960 नुसार देशात प्राण्यांचा अमानुषपणे छळ करणे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारचा गुन्हा हा शिक्षेस पात्र असतो. मात्र याच काद्यांर्गत एखाद्या प्राण्याला मांसासाठी मारण्यात येत असेल तर तो गुन्हा ठरत नाही.
इतर बातम्या :