Chennai: चेन्नईमध्ये एसीचा स्फोट झाल्याने तरुणाचा मृत्यू, स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला

काल रविवार असल्याने पी. श्याम हे काही कामानिमित्त त्यांच्या तळमजल्यात होते. तर त्याचवेळी त्यांचे वडील पहिल्या मजल्यावर त्याचं काम करीत होते.

Chennai: चेन्नईमध्ये एसीचा स्फोट झाल्याने तरुणाचा मृत्यू, स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला
मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून बनवायचा न्यूड व्हिडीओ, अनेक प्रकरणं उजेडात येताचं महिला हेल्पलाईन चक्रावलं Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 01, 2022 | 2:46 PM

चेन्नई: रविवारी रात्री चेन्नई (Chennai) येथील थिरू व्ही. का. नगर (Thiru v k Nagar) येथील एका घरात एसीचा (airconditioner) स्फोट झाल्याने एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अचानक ही घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ माजली होती. झालेला स्फोट इतका भयानक होता, की तरूणाचा जागीचं मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे एसीचा स्फोट झाला असावा असा अंदाज अग्निशमन आणि बचाव सेवा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पी. श्याम असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ज्यावेळी घरात एसीचा स्फोट झाला. त्यामुळे पी. श्याम हे घरातील तळमजल्यावर होते. तर त्याचे वडिल हे पहिल्या मजल्यावर होते अशी माहिती मिळाली आहे.

नेमकं काय झालं

काल रविवार असल्याने पी. श्याम हे काही कामानिमित्त त्यांच्या तळमजल्यात होते. तर त्याचवेळी त्यांचे वडील पहिल्या मजल्यावर त्याचं काम करीत होते. ज्यावेळी हा स्फोट झाला त्यावेळी जोरात आवाज झाला. त्यावेळी परिसरातील लोक नेमकं काय झालंय म्हणून परिसराची पाहणी करु लागले. पी. श्याम यांचे वडिल पहिल्या मजल्यावरून आवाज ऐकून खाली धावत आले. ज्यावेळी त्यांनी परिस्थिती पाहिली त्यावेळी त्यांनी पोलिस आणि अग्नीशमक दलाला तात्काळ फोन केला. कारण सगळीकडे आग लागली होती. तसेच धुराचे लोट देखील पसरले होते. पी. श्याम यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यापुर्वी त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पी. श्याम यांचा दुधाचा व्यवसाय आहे.

हे सुद्धा वाचा

आज पाहून सगळे घाबरले

स्फोट झाल्यानंतर घराच्या खोलीत मोठी आग लागली होती. तसेच धुराचे लोट देखील होते. त्यामुळे परिसरातील लोकांची गर्दी अधिक होती. घटनेची माहिती मिळताचं सेंबियम आणि माधवरम येथील पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग विझवून श्यामचा जळालेला मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर तो डॉक्टरकडे नेण्यात आला होता. तरुणाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी किलपॉक मेडिकल कॉलेज (केएमसी) रुग्णालयात पाठवला होता. श्यामने सहा महिन्यांपूर्वी 24 वर्षीय धनलक्ष्मी यांच्याशी लग्न केले. रविवारी रात्री ती आई-वडिलांच्या घरी होती. त्यामुळे तिचा जीव बचावला आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.