ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड, अचानक विजेच्या प्रवाहाचा वेग वाढला, फ्रिजला हात लागताच तडफडून मृत्यू
राजस्थानच्या जयपूर शहरात वीजेचा अचानक प्रवाह वाढल्याने एका कुटुंबाला विजेचा मोठा झटका बसला आहे (Man dies due to electric current from fridge).
राजस्थान : मुंबईच्या अरबी समुद्रात सध्या तौत्के चक्रीवादळ घोंघावत आहे. या वादळामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. तौत्के चक्रीवादळ आज संध्याकाळी किंवा मध्यरात्री गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर राज्यांमध्ये वातावरणात बदल झाल्याचं बघायला मिळत आहे. चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. दुसरीकडे राजस्थानच्या जयपूर शहरात वीजेचा अचानक प्रवाह वाढल्याने एका कुटुंबाला विजेचा मोठा झटका बसला आहे. या दुर्घटनेमुळे एकाचा मृत्यू झाला असून इतर चार जण गंभीर भाजले आहेत (Man dies due to electric current from fridge).
नेमकं काय घडलं?
जयपूरच्या हरमरा परिसरात संबंधित घटना घडली. हरमरा परिसरात राहणारे मोहम्मद रफीक यांच्या घरात संबंधित दुर्घटना घडली. त्यांच्या घरातील फ्रिजमध्ये अचानक करंट आला. फ्रिजला हात लावताच रफिक यांना विजेचा झटका बसला. यामध्ये त्यांचा मृत्यू होता. याशिवाय घरातील इतर चार सदस्यांनाही फ्रिजला हात लावल्याने विजेचा झटका बसला (Man dies due to electric current from fridge).
जखमींवर उपचार सुरु
या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. संबंधित परिसरात ट्रान्सफॉर्मरमध्ये काहीतरी बिघाड झाला होता. अनेक घरांमध्ये विजेचा प्रवाह वेगाने गेला. त्यामुळे अनेक घरांमधील शॉर्ट सर्किट झाला. अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या. तर रफिक यांच्या घरातील फ्रिजने त्यांचा बळी घेतला. तर इतर चार जणांना जखमी केलं.
दोष नेमका कुणाचा?
अचानक विजेचा प्रवाह वाढल्याने संबंधित घटना घडली. ट्रान्सफॉरमरमध्ये काहीतरी बिघाड झाल्याने संबंधित घटना घडली. या घटनेमुळे एका कुटुंबाचा कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेला जबाबदार नेमकं कोण? असा सवाल परिसरातील नागरिकांनी केला आहे. या घटने प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे.
हेही वाचा : निर्मनुष्य रस्त्यावर ‘डान्सिंग’ अॅम्ब्युलन्स, तिघा तरुणांसह अश्लील कृत्य करताना तरुणी रंगेहाथ