म्हशीच्या दुधावरुन राईचा पर्वत, प्रचंड गदारोळ, वाद विकोपाला, अक्षरक्ष: गोळीबार

आजमगढमध्ये म्हैस कमी दूध देते म्हणून दोन जण एकमेकांना भिडले. त्यानंतर एकजण बंदूक घेऊन आला आणि त्याने गोळीबार केला (man firing over dispute on buffalo milk in Azamgarh UP)

म्हशीच्या दुधावरुन राईचा पर्वत, प्रचंड गदारोळ, वाद विकोपाला, अक्षरक्ष: गोळीबार
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 10:46 PM

लखनऊ : म्हशीचं दूध महाग असतं. आजकाल म्हशींच्या किंमती देखील भरपूर आहेत. लाखो रुपयात म्हशी विकल्या जातात. मात्र, तरीही म्हशीच्या दुधावरुन जीवे घेण्यापर्यंतचा वाद होईल, अशी कुणी कल्पनाही करु शकत नाही. मात्र, उत्तर प्रदेशच्या आजमगढ शहरात असाच काहीसा विचित्र प्रकार घडला आहे. आजमगढमध्ये म्हैस कमी दूध देते म्हणून दोन जण एकमेकांना भिडले. त्यानंतर एकजण बंदूक घेऊन आला आणि त्याने गोळीबार केला. सुदैवाने या भांडणात कुणाला गोळी लागली नाही. मात्र, या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली (man firing over dispute on buffalo milk in Azamgarh UP).

नेमकं प्रकरण काय?

आजमगढ येथील धौराहरा गावात हा सर्व प्रकार घडला. गावातील फहीम आणि सोनू या दोघांमध्ये हा वाद झाला. फहीम हा सौदी अरेबियात नौकरी करतो. त्याची पत्नी सोहरैया बानो आणि मुलगा गावात राहतात. फहीमच्या कुटुंबियांनी सोनू याच्याकडून 42 हजार रुपयात म्हैस खरेदी केली. मात्र, म्हैस खरेदी केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी ती 75 टक्के दूध कमी देऊ लागली. पण खरेदी करताना म्हैस सात महिने तरी चांगलं दूध देईल, असं बोलणं झालं होतं. यावरुनच वाद झाला होता. फहीमच्या कुटुंबियांना म्हैस परत करायची होती. पण सोनू परत घेण्यास तयार नव्हता.

फहीमचा मुलगा थोडक्यात बचावला

याच वादातून सोनू बंदूक घेऊन आला. तो फहीमच्या घराच्या छतावर चढला. त्यानंतर त्याने घरात एका पाठोपाठ एक अशा चार गोळ्या झाडल्या. फहीमची मुलगी महजबीन हीने सांगितलं की, तिच्या भावाचा जीव थोडक्यात बचावला. तो अंथरुणावर झोपला होता. मात्र, गोळ्यांच्या आवाजाने जागी झाला (man firing over dispute on buffalo milk in Azamgarh UP).

आरोपीला अटक

गोळीबार करुन सोनू घटनास्थळावरुन फरार झाला. त्याने फहीमच्या घरातल्यांना घाबरवण्यासाठी हा प्रकार केल्याची शक्यता आहे. त्याच्या गोळीबारामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली होती. या घटनेची पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. फहीमच्या घराबाहेर फौजफाटा तैनात करण्यात आला. पोलिसांनी आरोपी सोनूला अटक केली. त्याचबरोबर आठ-दहा जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी सोनूकडून 300mm ची पिस्तूल पोलिसांनी जप्त केली आहे. त्याचबरोबर काही जिवंत काडतुसेही पोलिसांना त्याच्याकडून मिळाले आहेत.

हेही वाचा : VIDEO : नांदेडमध्ये लॉकडाऊन असताना शिख समुदायाकडून जंगी मिरवणूक, तुफान गर्दी, चार पोलीस जखमी

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.