तस्कराने चक्क शरीराच्या ‘या’ भागात लपवली सोन्याची पेस्ट, कल्पनेच्याही पलिकडे

सोन्याच्या पावडरच्या तस्करीसाठी तस्कर काय युक्ती वापरतील याचा काहीच भरोसा नाही. मणिपूरच्या इंफाल विमानतळावर एका पुरुषाच्या शरीरातून जवळपास 1 किलो सोन्याची पेस्ट सापडली आहे.

तस्कराने चक्क शरीराच्या 'या' भागात लपवली सोन्याची पेस्ट, कल्पनेच्याही पलिकडे
तस्कराने चक्क शरीराच्या 'या' भागात लपवली सोन्याची पेस्ट, कल्पनेच्याही पलिकडे
Follow us
| Updated on: Sep 29, 2021 | 11:57 PM

इंफाल : सोन्याच्या पावडरच्या तस्करीसाठी तस्कर काय युक्ती वापरतील याचा काहीच भरोसा नाही. काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर पकडलेल्या दोन महिला तस्करांनी गुप्तांगात सोन्याची पेस्ट लपविल्याची माहिती समोर आली होती. आता मणिपूरच्या इंफाल विमानतळावर एका पुरुषाच्या शरीरातून जवळपास 1 किलो सोन्याची पेस्ट सापडली आहे. या तस्कराने देखील थेट शरीरात सोन्याची पेस्ट लपविली होती. त्यामुळे विमानतळावर तैनात असलेले CISF चे जवान देखील चक्रावले.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही मंगळवारी (28 सप्टेंबर) घडली. CISF चे जवान नेहमीप्रमाणे विमानतळावर आपलं काम करत होते. या दरम्यान CISF चे सब-इन्सपेक्टर बी. डिल्ली यांची नजर एका प्रवाशावर पडली. त्या प्रवाशाच्या हालचाली थोड्या संशयास्पद वाटत होत्या. त्यामुळे त्यांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. यावेळी संबंधित प्रवाशाकडून उडवाउडवीचे उत्तर मिळत होती.

प्रवाशाने गुदद्वारात काहितीर लपविल्याचा जवानांना संशय

संबंधित प्रवाशाचं नाव मोहम्मद शरीफ होतं. तो केरळच्या कोझीकोड इथला रहिवासी आहे. तो दुपारी 2 वाजून 40 मिनिटांच्या एअर इंडियाच्या फ्लाईटने इंफानहून दिल्लीला जाणार होता. पण इंफाल विमानतळावर सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याच्यावर संशय आल्याने त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. यावेळी चौकशी दरम्यान प्रवाशाच्या गुदद्वारात काहितरी लपवलं असल्याचा संशय जवानांना आला.

एक्स-रेत माहिती उघड

जवानांनी अखेर मोहम्मद शरीफला सोक्यूरिटी होल्ड एरियात आणलं. तिथे त्याची कसून चौकशी करण्यात आली. पण तरीही त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. अखेर जवानांनी प्रवाशाच्या शरीराच्या खालच्या भागाचा एक्स-रे काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एक्स-रेचा रिपोर्ट बघून जवान हैराण झाले. कारण त्यामध्ये प्रवाशाच्या पोटात गोल-गोल 4 पॅकेट दिसत होते.

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी याबाबत त्याला विचारलं असता अखेर त्याने सर्व खरं सांगितलं. त्यावेळी त्याने ते चार पॅकेट्स सोन्याच्या पेस्टचे आहेत, असं सांगितलं. त्याच्या कबुली जाबाबानंतर शरीरातून सोन्याची पेस्ट काढण्यात आली. त्या सोन्याची पेस्टचं वजन केलं असता 909.80 ग्रॅम आलं. या सोन्याच्या पावडरची किंमत तब्बल 42 लाख इतकी आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरु आहे.

मुंबई विमानळावरही अशीच घटना

विशेष म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या महिन्यात मुंबईच्या एनसीबी अधिकाऱ्यांनी देखील सोन्याच्या पेस्टची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना पकडलं होतं. या महिलांनी देखील गुप्तांगात सोन्याच्या पुड्या लपवल्या होत्या. या तीनही महिला केनियाच्या नागरिक होत्या.

आरोपी महिलांना मुंबई विमानतळावर ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपल्याला त्रास होत असल्याचं एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर या महिलांना जे जे हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली. यावेळी त्या महिलांनी खरी परिस्थिती सांगितली.

डॉक्टरांच्या मदतीने लपवलेल्या वस्तू काढण्यात आल्या

या महिलांनी त्यांच्या गुप्तांगात वस्तू लपवली असल्याचं सांगितलं. डॉक्टरांच्या मदतीने त्या लपवलेल्या वस्तू काढण्यात आल्या. काढण्यात आलेली वस्तू हे सोनं होत. त्या तीन महिलांकडून 938 ग्राम सोनं जप्त करण्यात आलं आहे. 13 पाकिटात सोन्याचे 17 तुकडे लावण्यात आले होते. हे तुकडे 20 ग्राम ते 100 ग्रामचे होते.

हेही वाचा :

मुंबईकरांना धडकी भरवणारी घटना, बोरिवलीत अभियंत्याच्या कारवर भरदिवसा गोळीबार, भयानक थरार

गुप्तांगात सोनं लपवून मुंबईत आणलं, तीन स्त्रियांना शिताफीने अटक, NCB ची धडक कारवाई

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.