गर्लफ्रेंडला video call वर म्हणाला मी जातोय, अन् कारसह तलावात गेला , तरूणाचा बुडून मृत्यू

तरूणाने आधी गाडीत बसून मद्यपान केले व नंतर गर्लफ्रेंडशी बोलून तिचा निरोप घेतला. त्यानंतर तो कारसह तलावात पडला

गर्लफ्रेंडला video call वर म्हणाला मी जातोय, अन् कारसह तलावात गेला , तरूणाचा बुडून मृत्यू
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 2:56 PM

भोपाळ : मध्य प्रदेशमधील (MP)  भिंड येथे 1 मे रोजी शहरातील तलावात कार पडून अपघात झाला होता. कारमधील मित्रांनी पोलिसांना सांगितले की, राहुल डोहरे हा त्याच्या मैत्रिणीशी व्हिडिओ कॉलवर (video call)  बोलत होता. मैत्रिणीने भेटण्यास नकार दिल्याने राहुल डोहरे याने मी कायमचा निघून जात असल्याचे सांगून फोन कट केला. यानंतर तो काही वेळ शांत राहिला आणि त्यानंतर त्याने भरधाव वेगाने कार घेऊन तलावात उडी मारली. या अपघातात राहुलचा मृत्यू झाला तर कारमधील इतर दोन तरूण सुरक्षुत आहेत. पोलिसांनी दोघांचेही जबाब नोंदवून घेतले आहेत.

आधी गाडीत दारू प्यायला, मग गर्लफ्रेंडला बोलावलं

१ मे च्या रात्री, राहुल आणि नीतू आणखी एका मित्रासह डबल ओम्नी कारमध्ये होते. राहुल आणि नीतू यांनी कारमध्येच दारू प्यायली. नशा चढताच राहुलला त्याच्या गर्लफ्रेंडची आठवण झाली. यानंतर रात्री 11.15 वाजता राहुलने प्रेयसीला फोन केला. दोघांमध्ये बोलणं झालं. त्याने तिला व्हिडिओ कॉलही केला. त्याने तिला भेटायला बोलावले. मात्र तिने नकार दिला. तू आली नाहीस तर मी तलावात उडी मारून जीव देईन, असे राहूलने त्याच्या गर्लफ्रेंडला या घटनेनंतर तुमची बदनामी होईल. मात्र त्याच्या गर्लफ्रेंडला ते मान्य नव्हते, तिने येण्यास नकार दिला.

त्यानंतर राहूलने तलावाच्या दिशेने गाडी वळवली व तो त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलत राहिला. त्यांचा वाद झाला, त्यामुळे चिडलेल्या राहूलने गाडी भरधाव वेगाने तलावाच्या दिशेने नेली. त्याच्या एका मित्राने प्रसंगावधान राखून गाडीतून उडी मारली. मात्र राहूल व दुसरा मित्र तलावातच पडले. यात राहूलचा बुडून मृत्यू झाला, दुसरा मित्र सुदैवाने वाचला.

पोलिस करत आहेत तपास

या घटनेबद्दल कळल्यानंतर राहुलचा भाऊ, त्याची आई आणि इतर नातेवाईकांनी पोलीस ठाणे गाठून माहिती गोळा केली. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, कुटुंबीय पोलिसांसमोर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.