तो घरात आला, जेवला, झोपायला गेला, पत्नी बाथरुममध्ये शिरताच, पतीने तिच्या प्रियकराच्या पोटात चाकू खुपसला
कर्नाटकाच्या बंगळुरु येथील बयादरहल्ली येथे एका 31 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना समोर आली आहे (Man killed his wifes lover in Bengaluru).
बंगळुरु : कर्नाटकाच्या बंगळुरु येथील बयादरहल्ली येथे एका 31 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हत्या करण्यााधी आरोपी घरात सहा तासांपेक्षा जास्त वेळ एका खाटखाली दबा धरुन बसला होता. या आरोपीचं नाव कारपेंटर भरत कुमार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या आरोपीला लवकरच कोर्टात हजर करु, असं पोलिसांनी सांगितलं आहे (Man killed his wifes lover in Bengaluru).
नेमकं प्रकरण काय?
आरोपी भरतने आठ वर्षांपूर्वी विनुथा नावाच्या तरुणीसोबत लग्न केलं होतं. दोघांना दोन लहान मुलंदेखील आहेत. त्यांचा संसार सुखाने सुरु असताना त्यांच्या आयुष्यात अचानक शिवराज नावाचा तरुण आला. हा शिवराज भरतची पत्नी विनुथाचा मित्र होता. तो नोकरी शोधण्याच्या निमित्ताने विनुथाजवळ आला. त्याचं विनुथावर प्रेम होतं. त्याने विनुथाकडे आपलं प्रेम देखील व्यक्त केलं होतं. पण सुरुवातील विनुथाने त्याच्या प्रेमाच्या प्रस्तावाला नाकारलं होतं. नंतर काही दिवसांनी तिने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला (Man killed his wifes lover in Bengaluru).
पत्नीच्या प्रेमसंबंधाची माहिती भरतला कळाली
विनुथा आणि शिवराज यांच्या प्रेमसंबंधाची माहिती भरतला मिळाली. त्यानंतर भरतला शिवराजचा प्रचंड राग आला. याशिवाय त्यांच्या या प्रेमसंबंधांमुळे आपला संसार उद्ध्वस्त होईल, अशी भीती त्याला वाटली. त्यामुळे त्याने शिवराजचा काटा काढण्याचं ठरवलं. त्याने शिवराजचा हत्या करण्याचा निर्णय घेतला.
मध्यरात्री उशिरा भरतने हत्या केली
भरत हा बुधवारी (24 मार्च) रात्री 9 वाजता त्याच्या घरात शिरला. त्यानंतर तो घरात असलेल्या एका खाटेखाली लपून बसला. रात्री जवळपास साडेदहा वाजेच्या सुमारास शिवराज तिथे आला. विनुथाने शिवराजला जेवण दिलं. त्यानंतर दोघं झोपायला गेले. या दरम्यान भरत हा खाटेखाली चोरुन सर्व गंमत बघत होता. मध्यरात्री तीन वाजता भरतची पत्नी विनुथा बाथरुमला गेली. त्यानंतर भरतने बाथरुमच्या दरवाज्याची कडी बाहेरुन लावली. त्यानंतर त्याने शिवराजच्या पोटात चाकू खोपसून त्याची हत्या केली.
भरतला अटक, पोलिसांकडे गुन्हा कबूल
संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तातडीने तिथे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपी भरतला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपली चूक मान्य केली. याशिवाय आपला संसार सुरळीतपणे सुरु राहावा यासाठी हत्या केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. भरतची सध्या मेडिकल तपासणी सुरु आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून योग्य कारवाई करु, असं त्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा : दीपाली चव्हाण आत्महत्या : राग आणि संतापाचा उद्रेक, आतापर्यंत काय काय घडलं?