नागपूर : दोन दिवसांपूर्वी नागपूरातील गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या रजत संकुलमध्ये एका वृद्ध इसमाचे हात-पाय खुर्चीला बांधल्यानंतर गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. मृतक लक्ष्मण मलिक यांचा खून त्यांच्या पाचव्या क्रमांकाच्या पत्नी स्वातीने केल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. या प्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे (Man married with five women and his fifth wife murdered him in Nagpur).
नेमकं काय घडलं?
गेल्या काही दिवसांपासून मृतक लक्ष्मण मलिक हे एकटेच रजत संकुल येथील फ्लॅट मध्ये राहत होते. दरम्यान, 8 मार्चला संध्याकाळी त्यांची पाचव्या क्रमांकाची पत्नी स्वाती त्यांना भेटण्यासाठी त्या फ्लॅटवर गेली. यावेळी स्वातीने सोशल मीडियावर उपलब्ध असलेले पॉर्न व्हिडीओ दाखवून त्यांचे हात आणि पाय खुर्चीला बांधले. त्यानंतर तिने सोबत आणलेल्या धारधार चाकूने लक्ष्मण मलिक यांचा गळा चिरून खून केला. त्यानंतर स्वतीन घटनास्थळावरून पोबारा झाली.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मार्चला लक्ष्मण मलिक यांचा खून झाल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला असता अनेक धक्कादायक खुलासे झाले. मृतकाचे अनेक महिलांशी संबंध असल्याचा खुलासा झाला. मृतक मलिक यांनी तब्बल पाच महिलांशी लग्न केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली.
पाचव्या पत्नीकडून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
पोलिसांनी प्रत्येक महिलेला चौकशीसाठी बोलावले. यापैकी पाचवी पत्नी स्वातीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून पोलिसांचा तिच्यावरचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी स्वातीची कडक चौकशी केली. तेव्हा तिने लक्ष्मण मलिक यांचा खून केल्याची कबुली दिली (Man married with five women and his fifth wife murdered him in Nagpur).
पेन्शनच्या पैशांवरून दोघांमध्ये वाद
लक्ष्मण मलिक यांच्या पाचव्या क्रमांकाच्या पत्नीला मलिककडून एक आठ वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान त्या महिलेकडे आणखी एक तीन महिन्यांचे बाळ असल्याने या दोघांमध्ये वाद सुरू झाले होते. महिलेच्या म्हणण्यानुसार ते बाळ तिने नातेवाईकांकडून दत्तक घेतले होते. तर मृतकाला महिलेचे इतर पुरुषासोबत संबंध असल्याचा संशय होता. शिवाय मृतक हा सेवानिवृत्त असल्याने त्याला मिळणाऱ्या पेन्शनच्या पैशावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यातून या महिलेने लक्ष्मण मलिक यांचा खून केल्याचा खुलासा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली. मात्र मृतकाने पाच लग्न केले तरी कसे? अशी चर्चा परिसरात सुरु आहे.
हेही वाचा : VIDEO : ना हेल्मेट, ना तोंडावर मास्क, नियमांची ऐशीतैशी, तरुणीची बाईकवर हात सोडून स्टंटबाजी