घरात घुसून महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, धारदार शस्त्र दाखवत जीवे मारण्याची धमकी, डोंबिवलीतील धक्कादायक घटना

महिला घरी एकटी असताना परिसरातील सराईत गुन्हेगार महेश वाघ महिलेच्या घरात घुसला, धारदार शस्त्राचा धाक दाखवून महेशने महिलेवर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला (Man molest women in Dombivli).

घरात घुसून महिलेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, धारदार शस्त्र दाखवत जीवे मारण्याची धमकी, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 12:23 PM

ठाणे : डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला घरी एकटी असताना परिसरातील सराईत गुन्हेगार महेश वाघ महिलेच्या घरात घुसला, धारदार शस्त्राचा धाक दाखवून महेशने महिलेवर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. महिलेने जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून लोक महिलेच्या घरासमोर जमा झाले. मात्र आरोपी महेशला बघून नागरिक पळून गेले. यातून महेशची किती दहशत आहे हे दिसून येते. मात्र महिला घाबरली नाही. तिने विष्णुनगर पोलीस ठाण्यात जाऊन महेशच्या विरोधात तक्रार दिली. अखेर पोलिसांनी आरोपी महेश वाघला बेड्या ठोकल्या आहेत (Man molest women in Dombivli).

विशेष म्हणजे ही घटना शुक्रवारी (18 डिसेंबर) संध्याकाळी पाच वाजता घडली. महिलेच्या ओरडण्याचा आवाज एकूण तिच्या घराबाहेर प्रचंड गर्दी जमली. मात्र, आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याची परिसरात दहशत आहे. त्यामुळे कुणीही महिलेच्या मदतीसाठी पुढे आले नाहीत. अखेर महिलेने न भीता पोलीस ठाणे गाठत तक्रार केली. या तक्रारीची गंभीरपणे दखल घेत पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली.

या घटनेबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वधाने यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला माहिती दिली. “आरोपी महेश रमेश वाघ ऊर्फ मक्या हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने जबदस्ती महिलेच्या घरात घुसण्याच्या प्रयत्न केला. त्याने धारदार शस्त्र दाखवत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने यासंबंधी तक्रार केल्यानंतर अरोपीला अटक करण्यात आली. आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात याआधी चार गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांना आळा बसावा म्हणून सरकारने एक कडक कायदा आणला आहे. या कायद्यान्वे आरोपी विरोधात तातडीने कारवाई होणार आहे. मात्र, कडक कायदे आणूनही महिला विनयभंगाच्या घटना कमी होताना दिसत नाही. डोबिंवलीच्या घटनेत आरोपीला योग्य शिक्षा होईल, अशी अपेक्षा आहे (Man molest women in Dombivli).

हेही वाचा : इचलकरंजीमध्ये मटक्याच्या अड्ड्यांवर छापे, 76 हजार रुपयांसह 6 मोबाईल जप्त

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.