पैशांसाठी आधी बायकोचा विमा उतरवला, मग तिलाच गोळ्या घातल्या! इंटरनेटवर व्हिडीओ पाहून केलेल्या जुगाडमुळे पती गजाआड
आता अटक करण्यात आलेल्या आरोपीचा पोलिसांकडून तपास केला जातो आहे.
पैशांसाठी पतीनं पत्नीची हत्या (Husband killed wife) केली. तिला गोळ्या घालून ठार मारलं. ही धक्कादायक घटना घडली आहे मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh Crime News) राजगडमध्ये. विशेष म्हणजे पत्नीची हत्या (Murder Mystery) करण्यासाठी तिच्या विम्याचे पैसे मिळावेत म्हणून पतीने तिचा आधी विमा उतरवला होता. त्यानंतर गोळ्या घालून पत्नीचा खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटकही केली आहे. आरोपी पतीचं नाव बद्रीप्रसाद मीना असं आहे. तर त्याच्या पत्नीचं नाव पूजा होता. पूजाची हत्या करण्याआधी बद्रीप्रसाद मीना याने पूजाचा विमा काढला होता. आपली थकीत बिलं, उधारी आणि लोकांकडून घेतलेले पैसे परत देण्यासाठी, पैसे कसे आणि कुठून आणायचे, यासाठी बद्रीप्रसाद जुगाड करणार होता. हा जुगाड करण्यासाठी त्याने इंटरनेटची मदत घेतली. इंटरनेवर व्हिडीओ पाहून त्याला जी शक्कल सुचली होती, त्यानेच आता त्याला गजाआड नेलंय. या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी इतरही चार जणांना अटक केली होती.
व्हिडीओ पाहून कट रचला
मुख्य आरोपी असलेली मारेकरी पती बद्रीप्रदास मीना या वेगवेगळे व्हिडीओ इंटरनेटवर पाहिले होते. या व्हिडीओतून आधी इन्श्युरन्स काढण्याचा आणि त्यानंतर पत्नीची हत्या करण्याचा कट सुचला होता. 26 जुलै रोजी बद्रीप्रसादने त्याच्या पत्नीची हत्या केली होती. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्याने पुजावर गोळ्या झाडल्या होत्या. माना जोड या भोपाळ रोड येथील ठिकाणी त्याने पत्नीवर गोळ्या झाडल्या होत्या. यात गंभीर जखमी झालेल्या पूजाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचाराअंती तिचा मृत्यू झाला होता.
चौघांना अटक, पण…
पत्नीच्या हत्येनंतर आरोपीनेच पोलिसांत एफआयआर दाखल केला. त्या तक्रारीवरुन पोलिसांनी चौघा संशयित आरोपींनाही अटक केली होती. पण जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाचा खोलवर तपास केला, त्यानंतर या हत्याकांडा खुलासा झाला. अखेर पोलिसांनी बद्रीप्रसाद याला आणि त्याच्या साथीदाराला या हत्याकांड प्रकरणी अटक केली. शिवाय अटक केलेले संशियत चार जण हत्येवेळी घटनास्थळी नव्हतेच, याबाबतही उलगडा केला.
आता अटक करण्यात आलेल्या आरोपीचा पोलिसांकडून तपास केला जातो आहे. त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली असून आणखी एका साथीदाराचा शोध घेतला जातोय. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा होऊ नये, यासाठी पतीने षडयंत्र रचलं होतं. पण अखेर पत्नीच्या हत्येप्रकरणी पती बद्रीप्रसाद हा पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच.