Mansukh Hiren Death | मृतदेह चिखलात पालथा, तोंडात सहा-सात रुमाल कोंबलेले, पहिल्यांदा मृतदेह पाहिलेल्या तरुणांची धक्कादायक माहिती

मुंब्रा रेतीबंदर खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीच्या किनारी चिखलात फसलेल्या अवस्थेत होता. (Mansukh Hiren Dead body witness )

Mansukh Hiren Death | मृतदेह चिखलात पालथा, तोंडात सहा-सात रुमाल कोंबलेले, पहिल्यांदा मृतदेह पाहिलेल्या तरुणांची धक्कादायक माहिती
मनसुख हिरेन यांचा मृतदेह सर्वप्रथम पाहिलेले साक्षीदार
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 2:03 PM

ठाणे : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर (Mukesh Ambani Bomb Scare) सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) यांचा मृतदेह सापडल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मनसुख यांचा मृतदेह चिखलात पालथ्या अवस्थेत पडलेला दिसला. त्यांच्या तोंडात सहा ते सात रुमाल कोंबले होते, अशी माहिती त्यांचा मृतदेह पहिल्यांदा पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिली. वाघमारे आणि पंडित यांच्याशी ‘टीव्ही 9 मराठी’ ने बातचित केली. (Mansukh Hiren Dead body witness Waghmare Bhagwan pandit claims handkerchiefs found inside his mouth)

मृतदेह चिखलात पालथ्या अवस्थेत

मुंब्रा रेतीबंदर खाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीच्या किनारी चिखलात फसलेल्या अवस्थेत होता. खाडीच्या बाजूला रेल्वे ब्रिजचे काम चालू आहे. या ब्रिजच्या कामावरील सुपरवायझर वाघमारे हे किनाऱ्यावर लघुशंका करण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांना प्रथम मनसुख हिरेन यांचा मृतदेह चिखलात पालथ्या अवस्थेत पडलेला दिसला.

मृतदेह क्रेनला बांधून बाहेर

वाघमारेंनी तात्काळ 100 नंबरला फोन लावून पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी मृतदेह काढण्याची प्रक्रिया सुरु केली. पण मृतदेह चिखलात अडकलेला असल्यामुळे बाहेर काढणे शक्य होत नव्हते. शेवटी क्रेन मागवण्यात आली. त्यांचा मृतदेह कपड्यात बांधून पुन्हा दोरीने बांधून क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आला, अशी माहिती वाघमारेंनी दिली.

मास्कच्या आतमध्ये 6 ते 7 रुमाल

मृतदेह काढण्यासाठी आतमध्ये चिखलात भगवान पंडित नावाचा तरुण गेला होता, त्याने स्वतः मृतदेह बांधून बाहेर काढण्यास मदत केली आहे. मृतदेह काढल्यानंतर मनसुख हिरेन यांच्या तोंडावर मास्क होता, आणि मास्कच्या आतमध्ये 6 ते 7 रुमाल असल्याचे भगवान पंडितने स्वतः पाहिले आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मृतदेहाजवळ सुसाईड नोट, किंवा त्यांचा मोबाईल नव्हते असेही त्यांनी सांगितले आहे.

प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले, पाहा व्हिडीओ

पती आत्महत्या करु शकत नाही, पत्नी विमल हिरेन यांचा दावा

आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरी झाली. वेळोवेळी पोलिसांचा फोन येत होता. तेव्हा माझे पती चौकशीसाठी जात होते. त्यांना पूर्ण दिवस बसवून ठेवले जायचे. माझ्या पतींनी या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या आल्या मात्र, ते असं करु शकणार नाहीत. गुरुवारी कांदिवली क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांचा फोन आल्यानं ते गेले होते, अशी माहिती मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यानी दिली.

इथे पाहा : मनसुख हिरेन यांच्या तोंडावर एवढे रुमाल कसे? घातपाताचा संशय वाढणारा ‘तो’ व्हिडीओ

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एटीएसकडे

मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास ATS कडे देण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जाहीर केला आहे. विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना हा मोठा निर्णय जाहीर केला. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास एनआयएकडे द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने आज सभागृहात केली होती. याविषयावरुन सभागृहात चर्चाही पार पडली तसंच गृहमंत्र्यांनी निवेदनही दिलं. त्यानंतर आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास ATS देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे.

संबंधित बातम्या :

मनसुख हिरेन आत्महत्या करु शकत नाहीत, निष्पक्ष चौकशी व्हावी, पत्नी विमल हिरेन यांची प्रतिक्रिया

मनसुख हिरेन यांची हत्या की आत्महत्या? ते कोण होते? फडणवीस, गृहमंत्री देशमुख आणि मुलगा काय म्हणतो?

(Mansukh Hiren Dead body witness Waghmare Bhagwan pandit claims handkerchiefs found inside his mouth)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.