Mansukh Hiren Death Case | एटीएसची टीम मुंब्र्यात, हिरेन मृत्यू प्रकरणाचे नाट्य रुपांतर करणार

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात तपास करणारी मुंबई एटीएसची टीम आज मुंब्रा रेतीबंदर (ATS Team Will Recreate The Scene) परिसरात येऊन सीन रिक्रिएट करणार असल्याची माहिती आहे.

Mansukh Hiren Death Case | एटीएसची टीम मुंब्र्यात, हिरेन मृत्यू प्रकरणाचे नाट्य रुपांतर करणार
Mansukh Hiren
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 12:41 PM

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात तपास करणारी मुंबई एटीएसची टीम आज मुंब्रा रेतीबंदर (ATS Team Will Recreate The Scene) परिसरात येऊन सीन रिक्रिएट करणार असल्याची माहिती आहे. मनसुख हिरेन यांची हत्या नेमकी कशी झाली, कुठे झाली आणि हत्या करुन त्यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात आणून टाकला का?, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं यातून शोधण्याचा एटीएसचा प्रयत्न असणार आहे (Mansukh Hiren Death Case ATS Team Will Recreate The Scene At Mumbra Retibandar).

मुंबई एटीएसची टीम सीन रिक्रिएट करणार

मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्च रोजी मुंब्रा रेतीबंदर परिसरात आढळला होता. हा मृतदेह किनाऱ्यापासून तब्बल 80 फूट आतमध्ये आढळला होता. मात्र, एखाद्याची हत्या करुन मृतदेह इतक्या आतमध्ये फेकणं शक्य नसल्याचं मत मृतदेह बाहेर काढणाऱ्या क्रेनच्या चालकाने व्यक्त केलं. त्यामुळे मनसुख हिरेन यांची हत्या रेतीबंदर परिसरात झाली? की हत्या करून त्यांना खाडीत फेकण्यात आलं? असे प्रश्न उपस्थित झालेत.

याप्रकरणी आज एटीएसची टीम रेतीबंदर परिसरात क्राईम सीन रिक्रिएट करणार असून त्यातून या प्रश्नांची उत्तरं शोधून तपासाची दिशा ठरणार आहे.

मनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचं करू नये, असं संजय राऊतांचं आवाहन

दुसरीकडे, आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी मनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचं करू नये, असे आवाहन विरोधकांना केलं आहे. सरकारने मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं फासलं आहे, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे.

मुंबई पोलिसांच्या तोंडाला काळं कोणी फासलं? असा सवाल करतानाच विरोधी पक्षाने पोलिसांच्या तोंडाला काळं फासू नये. देवेंद्र फडणवीस हे पाच वर्ष सत्तेत होते. पोलिसांचं काम कसं चालतं हे त्यांना माहीत आहे. त्यांनी अशी भाषा करु नये, असा सल्ला संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिला. तसेच मुनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचं करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं.

हिरेन प्रकरणी पोलिसांचं खच्चीकरण – संजय राऊत

टीव्ही 9 मराठीशी बोलताना संजय राऊत यांनी विरोधी पक्षावर सडकून टीका केली. हिरेन मृत्यूप्रकरण कोणीही राजकीय प्रतिष्ठेचा विषय करु नये. कुणाचाही मृत्यू वाईटच असतो. मग तो अन्वय नाईक यांचा असो, नाईक यांच्या आईचा असो, मोहन डेलकर यांचा असो की मनसुख हिरेन यांचा असो. अनैसर्गिक मृत्यूचा तपास व्हायलाच हवा. त्यासाठी राज्याचे पोलीस आणि यंत्रणा सक्षम आहेत. विरोधी पक्षाने त्यावर शंका घेणं म्हणजे पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करण्यासारखं आहे. त्यांच्याकडे पुरावे असतील आणि त्याची दखल घेतली जात नसेल तर त्यांनी वेगवेळ्या प्लॅटफॉर्मवर आवाज उठवला पाहिजे, असं राऊत म्हणाले.

सचिन वाझेंना क्राईम ब्रॅचमधून हटवलं

हिरेन मनुसख प्रकरणात विरोधकांच्या सभागृहातील गदारोळानंतर राज्य सरकारने सचिन वाझे यांना गुन्हे शाखेतून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी विधानपरिषदेत यासंदर्भातील घोषणा केली. विरोधकांनी मागणी केल्याप्रमाणे आम्ही सचिन वझे यांना हिरेन मनसुख प्रकरणाच्या तपासावरुन आणि गुन्हे शाखेतून हलवण्याचा निर्णय घेतल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

मनसुख हिरेन प्रकरणात विमल हिरेन यांनी दिलेल्या जबाबानुसार तपास सुरु आहे. विरोधकांकडे काही पुरावे, सीडी किंवा सीडीआर असतील तर त्यांनी एटीएसकडे द्यावेत. एटीएस याबाबत कोणालाही पाठिशी घालणार नाही. सचिन वझे किंवा कोणाचाही जावई असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असे आश्वासन अनिल देशमुख यांनी दिले (Mansukh Hiren Death Case ATS Team Will Recreate The Scene At Mumbra Retibandar).

देवेंद्र फडणवीस विधानसभेत काय म्हणाले?

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचे पडदास विधिमंडळात उमटत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांच्या पत्नी विमला यांचा तक्रार अर्जच मंगळवारी (9 मार्च) वाचून दाखवला. विमला हिरेन यांच्या संशयानुसार हिरेन यांची हत्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनी केली आहे. त्यामुळे वाझेंना तात्काळ अटक करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. माझ्या पतीची चौकशी वाझे यांनीच केली होती. हिरेन तीन दिवस वाझेंकडेच होते. तसेच हिरने यांची गाडीही चार महिने वाझेंकडेची होती, असं हिरेन यांच्या पत्नीने म्हटलं आहे. त्यामुळे वाझेंना 201 कलमाखाली अटक का झाली नाही? वाझे यांना कोण वाचवतंय? असा सवाल करतानाच हिरेन यांची हत्या गाडीतच करण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.

Mansukh Hiren Death Case ATS Team Will Recreate The Scene At Mumbra Retibandar

संबंधित बातम्या :

VIDEO: देवेंद्र फडणवीस यांचं सर्वात मोठं विधान; पत्नीच्या संशयानुसार मनसुख हिरेन यांची सचिन वाझेंकडून हत्या

मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची चौकशी एसआयटीद्वारे करणार, गृहमंत्र्यांची घोषणा

Mansukh Hiren Death Case | एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा हत्येच्या अँगलनं तपास करणार

मनसुख हिरेन प्रकरण राजकीय प्रतिष्ठेचं करू नये; संजय राऊत यांचं विरोधकांना आवाहन

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.