Mansukh Hiren Death Case | मनसुख हिरेन यांच्या डोळ्यावर, पाठीवर जखमा, मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता
त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढण्याची शक्यता आहे. (Mansukh Hiren Death Case Post Mortem Report)
मुंबई : मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक सापडलेल्या स्कॉर्पियोचा मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा काल (5 मार्च) संशयास्पद मृत्यू झाला. मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या चेहऱ्याजवळ, डोळ्यावर आणि पाठीवर जखमा असल्याची बाब शवविच्छेदन अहवालात उघड झाली आहे. पण या जखमा नेमक्या कधी झाल्या? याचा काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढण्याची शक्यता आहे. (Mansukh Hiren Death Case Post Mortem Report)
शवविच्छेदन अहवालात दिलेल्या माहितीनुसार, मनसुख यांच्या डोळ्याजवळ आणि चेहऱ्यावर छोट्या जखमा होत्या. तसेच त्यांच्या पाठीवर दोन ठिकाणी जखमा असल्याचे बोललं जात आहे. जर मनसुख यांनी आत्महत्या केली असेल तर एकाच बाजूला जखमा होणे अपेक्षित होते. मात्र दोन्ही बाजूला झालेल्या जखमांमुळे संशयाचे गूढ वाढत चाललं आहे. पोलिसांनी याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र पीएम रिपोर्टमध्ये याबाबतचा उल्लेख आहे.
मनसुख यांच्या शरीरावर असलेल्या या जखमा एक सेंटिमीटरच्या आहेत. मनसुख यांचा मृतदेह 8 ते 10 तास पाण्यात पडून होता. त्यामुळे पाण्यातील काही जीवांमुळे या जखमा झाल्यात का याबद्दल खुलासा होणे बाकी आहे. या जखमा नेमक्या कधी झाल्यात हे यात नमूद होणे आवश्यक होते. मात्र त्यात हे नमूद करण्यात आलेले नाही.
शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल
मनसुख यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात करण्यात आले. काल रात्री उशिरापर्यंत हे पोस्ट मार्टम सुरु होते. चार डॉक्टरांच्या टीमने मिळून हे पोस्टमार्टम केलं. या पोस्ट मार्टमचे चित्रीकरण देखील करण्यात आले. मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा अहवाल घेऊन सहाय्यक उपायुक्त अविनाश अंबुरे हिरेन यांच्या घरी दाखल झाले. यानंतर अविनाश अंबुरे यांच्याकडून हिरेन कुटुंबियाना अहवाल दाखवण्यात आला.
मनसुख हिरेन यांचा मृत्यू 12 ते 14 तासांपूर्वी झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालाद्वारे स्पष्ट झाला आहे. पण त्यांचा मृत्यू नेमकं कोणत्या कारणामुळे झाला, हे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कोणताही घातपात झालेला नाही. तसेच मनसुख यांच्या शरीरावर कोणतीही बाह्य जखम नाही. तसेच कुठलाही फाऊल प्लेबाबत रिपोर्ट नाही, असे यात नमूद करण्यात आलं आहे. (Mansukh Hiren Death Case Post Mortem Report)
संबंधित बातम्या :
Mansukh Hiren Death Case | मृतदेह सापडला, शवविच्छेदन ते अंत्यसंस्कार, दिवसभरात काय काय घडलं?