Mansukh Hiren Murder : मनसुख हिरेन हत्येचा मुख्य सूत्रधार प्रदीप शर्मा, पोलीस आयुक्तालयात कट रचला! NIAकडून प्रतिज्ञापत्र सादर
मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हे प्रदीप शर्मा आहेत आणि कथित कट हा मुंबई पोलीस आयुक्तालयांच्या इमारतीतच शिजल्याचा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आलाय.
मुंबई : मनसुख हिरेन हत्या (Mansukh Hiren Murder) प्रकरणात राष्ट्रीय तपाय यंत्रणा अर्थात NIA कडून मुंबई हायकोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय. या प्रतिज्ञापत्रात NIA ने धक्कादायक दावा केलाय. मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हे प्रदीप शर्मा (Pradip Sharma) आहेत आणि कथित कट हा मुंबई पोलीस आयुक्तालयांच्या इमारतीतच शिजल्याचा दावा या प्रतिज्ञापत्रात करण्यात आलाय. प्रदिप शर्मासह इतर आरोपी अनेक बैठकींना उपस्थित होते. सचिन वाझेने (Sachin Vaze) मनसुख हिरेनच्या हत्येसाठी प्रदीप शर्मा यांना 45 लाख रुपये दिले होते, असा उल्लेखही एनआयएने आपल्या प्रतिज्ञापत्रात केलाय.
एन्टिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी असलेले प्रदीप शर्मा सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रदीप शर्मा यांनी जामिनासाठी अर्ज केला होता आणि त्यावर एनआयएचं म्हणणं काय? हे त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावं अशा सूचना हायकोर्टानं एनआयएला दिल्या होत्या. त्यानुसार एनआयएने आज प्रतिज्ञापत्र सादर केलं असून त्यात मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हे मुख्य सूत्रधार आहेत आणि सचिन वाझे याने शर्मा यांना त्यासाठी 45 लाख रुपये दिल्याचं या प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे. तसंच एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या जामिनाला कडाडून विरोध केलाय. याशिवाय मनसुख हिरेन हत्येचा कट पोलीस मुख्यालयात शिजला होता, सचिन वाझेच्या कार्यालयात शिजला होता. त्या बैठकीला इतर आरोपीही हजर होते. तिथेच कट शिजला आणि त्यानुसार मनसुख हिरेनची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह मुंब्रा इथल्या रेतीबंदरच्या खाडीत टाकण्यात आला, असा दावा एनआयएने आपल्या प्रतिज्ञापत्रात केलाय.
कोण आहेत प्रदीप शर्मा ?
एन्काऊटंर स्पेशलिस्ट प्रदीप शर्माची ओळख मुंबई पोलिस दलातील माजी पोलिस अधिकारी 113 गँगस्टरचं एन्काऊटंर प्रदीप शर्मा यांच्या नावे शिवसेनेच्या तिकीटावर 2019 मध्ये नालासोपारा विधानसभा निवडणूक लढवली, मात्र पराभव 1983 पासून मुंबई पोलिस दलात कार्यरत होते. लखन भैया बनावट एन्काऊटर प्रकरणात 2010 मध्ये अटक झाली होती 2013 मध्ये प्रदीप शर्मा जेलमधून बाहेर आले प्रदीप शर्मा यांना पुन्हा मुंबई पोलिस दलात रूजू करण्यात आलं. 2017 मध्ये दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला शर्मांनी अटक केली होती.
प्रदीप शर्मा हे 1983 मध्ये पोलिस सेवेत रुजू झाले. गेल्या अनेक ते वर्षापासून मुंबई गुन्हे शाखा आणि स्पेशल टास्क फोर्समध्येच कार्यरत होते. ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकात वरिष्ठ निरीक्षक पदावर ते काम करत होते. पोलिस दलात सर्वाधिक एन्काउंटर करणारे पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
मुंबई बॉम्बस्फोटातील ‘लष्कर-ए-तोयबा’च्या तीन अतिरेक्यांसह सादिक काल्या, विनोद मटकर, सुहास माकडवाला, रफीक डबा अशा अनेक कुख्यात गुंडांचा त्यांनी एन्काऊंटर केला आहे. विशेष म्हणजे ‘लष्कर-ए-तोयबा’च्या अतिरेक्यांसह तब्बल 113 गुन्हेगारांच्या एन्काऊंटरची नोंद त्यांच्या नावे आहे.