नागरिकांना गंडा घालण्यात माहिर असलेल्या विष्णु महिपत जाधव विरोधात अनेकांची शिवाजीपार्क पोलिसात धाव

दादरमधील फसवा बिल्डर विष्णू जाधव विरोधात आणखी एक प्रकरण पुढे आलं आहे. त्याला अटक झाल्यानंतर आता आणखी काही प्रकरणं पुढे येण्याची शक्यता आहे.

नागरिकांना गंडा घालण्यात माहिर असलेल्या विष्णु महिपत जाधव विरोधात अनेकांची शिवाजीपार्क पोलिसात धाव
Follow us
| Updated on: Jun 12, 2023 | 10:44 PM

मुंबई : शिवाजीपार्क पोलिस स्टेशन समोर असलेल्या नावलकर इमारतीचा लॅन्डलॉर्ड विष्णु महिपत जाधव पुनर्विकासाच्या नावाखाली लोकांना गंडा घालण्याचे षडयंत्र गेले कित्येक वर्ष यशस्वीरित्या चालवतो आहे. पासष्ठीच्या घऱात असलेल्या विनय जगन्नाथ वाटेगावकर यांना आरोपी विष्णु महिपत जाधव ने १ कोटी १० लक्ष रुपयांना लुटल्याचे समोर आले आहे. विष्णु महिपत जाधवने सिद्धिविनायक डेव्हलपर्सच्या माध्यमातुन वाटेगावकरांना पुनर्विकासाचे स्वप्न दाखवले. वाटेगावकर यांनी १ कोटी १० लक्ष रुपये निवृत्तीनंतरचा सर्व निधी तसेच नातेवाईकांकडुन काही मदत गोळा करुन विष्णु जाधवला पैसे २०१५ साली दिले. इमारतीचा पुनर्विकास करुन २०१८ साली फ्लॅटचा ताबा देण्याचे विष्णु जाधवने विनय वाटेगावकर यांना कबुल केले होते.

मात्र वेळोवेळी काही ना काही बहाणे शोधुन विष्णु जाधव, वाटेगावकर यांना टाळु लागला. सतत फॉलोअप करुनही हाती काही लागत नसल्याने विनय वाटेगावकर पैसे परत मिळावे यासाठी गयावया करु लागले. पैसे परत देतो असे आरोपी विष्णु जाधवने अनेक वेळा वाटेगावकरांना आश्वासनं दिले. मात्र २०२३ साल उजाडेपर्यंत वाटेगावकरांना पैसे परत मिळु शकलेले नाहीत.

याच विष्णु महिपत जाधवला शिवाजीपार्क पोलिसांनी ९ जुन २०२३ रोजी अटक केली. दादर परिसरातील एका महिलेला ३७ लक्ष रुपयांना फसवल्याप्रकरणी शिवाजीपार्क पोलिसात ९ जुन २०२३ रोजी गुन्हा दाखल झालाय. आरोपी विष्णु महिपत जाधव पोलिसांच्या तावडीत सापडताच ज्यांना विष्णु जाधवने गंडा घातलाय, त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शिवाजीपार्क पोलिसात विष्णु महिपत जाधव विरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी अनेकांनी धाव घेतली आहे. त्यापैकीच एक म्हणजे ज्येष्ठ नागरिक विनय वाटेगावकर. विनय वाटेगावकर सध्या पासष्टीच्या घरात आहेत. आयुष्यभराची कमाई लुटली गेल्याने गोवा येथे मुळ गावी राहण्यावाचुन वाटेगावकर यांच्याकडे पर्याय नाही.

निवृत्तीनंतर स्वताच घर असाव या आशेने आयुष्यभर कमावलेली संपत्ती वाटेगावकर यांनी विष्णु जाधवच्या हाती सोपवली मात्र विष्णु जाधवने वाटेगावकरांची निव्वळ फसवणुक केली. दादर परिसरात काही एजंटशी हातमिळवणी करुन गंडा घालणाऱ्या टोळीचा म्होरक्या विष्णु महिपत जाधववर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता शिवाजीपार्क पोलिसांकडे होत आहे.

शिवाजीपार्क पोलिस स्टेशन समोर असलेल्या नावलकर इमारतीचा लॅन्डलॉर्ड विष्णु महिपत जाधव याने अनेक लोकांना कोट्यवधीचा गंडा घातला आहे. इमारतीचा लॅन्डलॉर्ड विष्णु महिपत जाधवने इमारतीच्या पुनर्विकासाचे स्वप्न दाखवुन २०१८ साली १४ लोकांना २ कोटी ३४ लक्ष ६८ हजार रुपयांना गंडा घातला. त्या संदर्भात एफआयआर १५९/१८ कलम ४२० भादवी शिवाजीपार्क पोलिसात नोंद आहे. २०१८ साली जामीनावर बाहेर येताच विष्णु जाधवने लोकांना गंडा घालण्याचा धंदा पुन्हा वेगाने सुरु केला.

माहिम पोलिस स्टेशन परिसरात सुद्धा चेक बाऊन्स प्रकरणी विष्णु जाधव विरुद्ध कलम १३८ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. बरेच दिवस पोलिसांच्या हातवर तुरी देऊन फरार असलेला विष्णु जाधव मोठ्या शिताफीने शिवाजीपार्क पोलिसांनी पकडुन आणला. शिवाजीपार्क पोलिसांच्या तावडीत असलेल्या मिस्टर नटवरलालने मुंबईत अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची नवनवी प्रकरणं आता समोर येत आहेत. मंगळवारी भोईवाडा कोर्टात विष्णु महिपत जाधवला सुनावणीसाठी हजर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.