जेवण करायला नकार दिला म्हणून पत्नीची हत्या! झोपेतच पतीने पत्नीला…

सोमवारी रात्री उशिरा राम सिंह घरी आला, तेव्हा त्याने पत्नीला जेवण वाढण्यास सांगितलं. पत्नीने काहीच जेवण न केल्याचं राम सिंहला सांगितलं. यानंतर दोघांमध्ये भांडण झालं. भांडणानंतर अखेर उषा देवी झोपण्यासाठी गेली. पत्नी झोपल्यानंतर पती राम सिंह याने डाव साधला.

जेवण करायला नकार दिला म्हणून पत्नीची हत्या! झोपेतच पतीने पत्नीला...
धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 09, 2022 | 1:45 PM

नवरा बायकोमधील (Husband Wife fight) शुल्लक भांडणं हिंसा आणि हत्येपर्यंत (Murder News) जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. देहरादूनमध्ये एक पतीने आपल्या पत्नीची हत्या (Wife killed by husband) केली. या हत्येमागचं कारण हादरवणारं आहे. पत्नीने रात्रीचं जेवण करण्यास नकार दिला म्हणून पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. या हत्याकांड प्रकरणातील आरोपी पतीला पोलिसांनी अटकही केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या आरोपीचं वय हे तब्बल 72 वर्ष आहे. आरोपीने आपल्या 53 वर्षांच्या पत्नीची सोमवारी हत्या केली.

नेमकी कुठे घडली घटना?

देहरादूनमधील दलनवाला येथे हा खळबळजनक प्रकार घडला. अटक करण्यात आरोपीचं नाव राम सिंग असं आहे. त्याने पत्नी उषा देवी हीची हत्या केली. राम सिंग हा एक फास्टफुडचा स्टॉल चालवण्याचं काम करतो. हत्येपासून वाचण्यासाठी त्याने एक बनाव रचला होता. राम सिंहने आपल्या पत्नीला बॅटने जबर मारहाण केली होती. यात पत्नी गंभीररीत्या जखमी झाली. रक्तबंबाळ झालेल्या पत्नीला उपचारासाठी घेऊन जायचा विचार त्याच्या मनात आला.

राम सिंह यांने रुग्णालयात फोन करुन रुग्णवाहिका बोलावली. पत्नी शिडीवरुन पडून जखमी झाल्याचं त्यांनं सांगितलं. पण दुर्दैवाने रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर राम सिंहची पत्नी उषा देवी यांना मृत घोषित करण्यात आलं. अखेर पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. चौकशीदरम्यान पोलिसांना राम सिंहवर संशय आला. म्हणून त्यांनी राम सिंह याला ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या फेरतपासणीत राम सिंह यानेच पत्नीची हत्या केल्याचं उघड झालंय.

हे सुद्धा वाचा

पाहा LIVE घडामोडी : Video

2 वर्षांचा संसार उद्ध्वस्त

73 वर्षीय राम सिंहने दोन वर्ष आधीच उषा देवीसोबत लग्न केलं होतं. गंभीर आजारामुळे राम सिंहच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता. तसंच मुलांचाही मृत्यू झाला होता. उषा देवीसोबत लग्न केल्यानं राम सिंह आपल्या 14 वर्षीय नातवासोबत राहत होते.

राम सिंह याने पत्नी झोपेत असताना तिच्यावर क्रिकेट बॅटने हल्ला केला. या हल्ला इतका जबर होता, की त्यात पत्नी उषा देवी ठार झाली. सोमवारी रात्री उशिरा राम सिंह घरी आला, तेव्हा त्याने पत्नीला जेवण वाढण्यास सांगितलं. पत्नीने काहीच जेवण न केल्याचं राम सिंहला सांगितलं. यानंतर दोघांमध्ये भांडण झालं.

भांडणानंतर अखेर उषा देवी झोपण्यासाठी गेली. पत्नी झोपल्यानंतर पती राम सिंह याने डाव साधला आणि तिचा जीव घेतला. उषा देवी ही देहरादूनमधील कुख्यात कुख्यात गुंड करन शिवपुरी याची आई होती, अशीही माहिती पोलिसांच्या तपासात समोर आलीय.

पोलिसांना आता आरोपी राम सिंह याला अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय. दरम्यान, वर्षभरापुरी पुण्यात एक महिलेनं पती घरी पाणीपुरी घेऊन आला म्हणून आत्महत्या केली होती. घरी जेवण करुनही पती बाहेरुन पाणी पुरी घेऊन आल्यानं पुण्यातील महिलेन आपलं आयुष्य संपवलं होतं. दरम्यान, आता पत्नीनं जेवण केलं नाही, म्हणून तिची हत्या करण्यात आल्याची घडना उघडकीस आल्यानं खळबळ उडालीय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.