Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिमुरडीला घरी घेऊन जाताना त्यांच्या मनात नको ते आलं, पण आईने तात्काळ धाव घेतली म्हणून…

महिला, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. अशीच एक हादरवून करणारी घटना उघडकीस आली आहे.

चिमुरडीला घरी घेऊन जाताना त्यांच्या मनात नको ते आलं, पण आईने तात्काळ धाव घेतली म्हणून...
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचा शेजाऱ्याकडून विनयभंगImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 09, 2023 | 5:52 PM

सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली : कल्याण डोंबिवली शहरात बलात्कारांच्या घटना वाढत असताना आता अल्पवयीन मुलींची छेड काढण्याचे प्रमाणही वाढले आहे. डोंबिवलीमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन मुलीचा शेजाऱ्यानेच विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

काय आहे प्रकरण?

शुक्रवारी सायंकाळी पिडीत मुलीची आई ही शेजाऱ्यांकडे गेली होती. यावेळी आईने मुलाला आणि मुलीला तुम्ही मागून या, असे सांगितले. मग भाऊ आपल्या बहिणीला घेऊन जात असतानाच आरोपीने त्या अल्पवयीन मुलीला हात पकडून घरी आणले. ही बाब लगेच मुलाने आईला सांगितली. पिडीत मुलीच्या आईने त्वरीत घराकडे धाव घेतली. त्यांच्या घराचा दरवाजा हा उघडा होता तर आरोपीच्या घराचा दरवाजा बंद असल्याने तिने ठोठावला. त्यानंतर त्यांच्या मुलीने रडत रडत घराचा दरवाजा उघडला.

आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

आईने मुलीला घरात नेऊन तिला विश्वासात घेऊन तिच्यासोबत काही झाले का? याची विचारणा केली. पिडीत मुलीने आरोपीने केलेल्या विनयभंगाबाबत आईला सविस्तर सांगितले. यानंतर आईने रामनगर पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भा.द.वि कलम 354 बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक आशा निकम आणि त्यांचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.